महिलांना प्रादेशिक सैन्यात सामील होण्याची परवानगी द्या
By admin | Published: November 16, 2015 12:14 AM2015-11-16T00:14:25+5:302015-11-16T00:14:25+5:30
प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) महिलांनाही स्थान द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : प्रादेशिक सैन्यात (टेरिटोरियल आर्मी) महिलांनाही स्थान द्यावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. प्रादेशिक सेना स्वयंसेवींचे एक संघटन आहे. आपत्स्थितीत देशाच्या संरक्षणासाठी सज्ज राहण्याहेतू त्यांना लष्करी प्रशिक्षण दिले जाते.
तूर्तास केवळ पुरुषांनाच भारतीय प्रादेशिक सैन्यात स्थान आहे. महिलांना यात स्थान नसणे हा संस्थात्मक भेदभाव आहे. हा लिंगभेद महिलांचे मौलिक स्वातंत्र्य आणि मानवाधिकाराचे उल्लंघन आहे, असे या जनहित याचिकेत म्हटले आहे. पेशाने वकील ज्योतिका कालरा यांच्या माध्यमातून ही जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. भारतीय सशस्त्र दलाप्रमाणे प्रादेशिक सेना रोजगाराचे स्रोत नाही. असैनिकी पेशात नोकरी वा स्वयंरोजगार, ही प्रादेशिक सैन्यात सामील होण्याची पहिली अट आहे. अभिनेता मोहनलाल, तसेच क्रिकेकपटू कपिल देव व महेंद्रसिंह धोनी प्रादेशिक सैन्याचे मानद सदस्य आहेत.