रस्ता बांधला पण नदीवर पूल बांधायलाच विसरले; 15 वर्षांपासून गावकऱ्यांचा जीवघेणा प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2020 12:25 PM2020-11-09T12:25:11+5:302020-11-09T12:33:07+5:30
Forgot Built Bridge On River : गेल्या 15 वर्षांपासून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे.
नवी दिल्ली - उत्तराखंडच्या अल्मोडा जिल्ह्यामधील एका गावातील लोकांना सरकारी कामातील गोंधळाचा फटका बसला आहे. गेल्या 15 वर्षांपासून गावकऱ्यांना जीवघेणा प्रवास करावा लागत असल्याची माहिती आता समोर आली आहे. सोमेश्वर विधानसभा क्षेत्रामधील लोकांना सरकारी कामातील बेजबाबदारपणाचा फटका बसला आहे. राज्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने ताकुला ते सोमेश्वर असा रस्ता तर तयार केला आहे. पण रस्ता तयार करताना नदीवर पूल बांधायलाच विसरले.
नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना रोज जीव मुठीत घालून नदी पार करावी लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमेश्वर विधानसभा मतदारसंघामधील बसौली-सोमेश्वर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत बांधण्यात आला आहे. मात्र त्यावेळी या मार्गात लागणाऱ्या नदीवर पूल बांधण्यात आलेला नाही. ते काम अद्यापही अपूर्णच आहे. येथील विधानसभा मतदारसंघामधून 2007 साली निवडून आलेले अजम टम्टा हे राज्याच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते.
सरकारी कामातील गोंधळाचा फटका, स्थानिकांना जीव मुठीत घेऊन करावा लागतोय प्रवास
आमदार रेखा आर्या सध्या राज्यमंत्री आहेत. मात्र असं असतानाही या नदीवरील पूल बांधण्याची योजना केवळ कागदावरच राहिल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जिल्हा पंचायतीचे सदस्य असणाऱ्या योगेश बाराकोटी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चालत जाणारे लोक असो किंवा बाईक अथवा चारचाकी गाडीने जाणारी मंडळी असो सर्वांना नदीच्या पाण्यामधूनच प्रवास करावा लागतो. यामुळे अनेकदा अपघातही झाले आहेत. अनेकदा गाड्या पण्याच्या प्रवाहामध्ये अडकतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. योगेश यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला याबाबत माहिती दिली आहे.
पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार अनेकदा नदी पाण्याचा प्रवाह जास्त असल्याच ताकुलवरुन सोमेश्वरला जाता येत नाही. महिला आणि मुलांना नदी ओलांडणे खूपच कठीण जातं. पावसाळ्यामध्ये मुलांना शाळेत पाठवताना अधिक धोका असल्याचं देखील स्थानिकांनी म्हटलं आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे अल्मोडामधील अभियंते असणाऱ्या किशन आर्या यांनी या ठिकाणी पूल बांधण्याची योजना अनेकदा तयार करण्यात आली मात्र त्यासाठी ठेकेदार मिळाला नाही अशी माहिती दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
"प्रदुषणाच्या नावाखाली फटक्यांसंदर्भात जास्त ज्ञान पाजाळू नका"https://t.co/J9r1fmAO9U#Diwali#Diwali2020#Firecrackers#BJPpic.twitter.com/wj9hSvO7rz
— Lokmat (@MiLOKMAT) November 9, 2020