जयललितांचे भाचे पनीरसेल्वमच्या बाजूने

By admin | Published: February 25, 2017 12:37 AM2017-02-25T00:37:52+5:302017-02-25T00:37:52+5:30

तामिळनाडूच्या राजकीय नाट्यात शुक्रवारी नव्या अंकाची भर पडली. जयललिता यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे भाचे दीपक जयकुमार यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची बाजू घेत

Along with Jayalalitha's niece Panesarelvam | जयललितांचे भाचे पनीरसेल्वमच्या बाजूने

जयललितांचे भाचे पनीरसेल्वमच्या बाजूने

Next

चेन्नई : तामिळनाडूच्या राजकीय नाट्यात शुक्रवारी नव्या अंकाची भर पडली. जयललिता यांच्या जयंतीच्या दिवशीच त्यांचे भाचे दीपक जयकुमार यांनी माजी मुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची बाजू घेत सरचिटणीस शशिकला यांना जाहीर विरोध केला आहे. गेल्या आठवड्यापर्यंत शशिकला यांच्या गटाचे जाणारे जयकुमार यांनी ही भूमिका घेतल्याने शशिकला यांच्यासाठी हा मोठा धक्का समजला जात आहे.
न्यायालयाने जयललिता यांना भरण्यास सांगितलेला शंभर कोटी रुपयांचा दंड भरण्याची तयारीही दीपक जयकुमार यांनी दर्शविली आहे. तर, पक्षाची एकजूट कायम राखण्यासाठी ओ. पनीरसेल्वम यांच्याकडे नेतृत्व द्यायला हवे, असेही ते म्हणाले. जयललिता यांची भाची दीपा जयकुमार या सुरुवातीपासून शशिकला यांच्या विरोधात आणि पनीरसेल्वम यांच्या बाजूने उभ्या आहेत.
दीपक जयकुमार म्हणाले की, दिनकरन यांची पक्षाच्या उप महासचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पण, ते या पदासाठी पात्र नाहीत. दिनकरन यांना जयललिता यांनी खासदार केले होते. पण, नंतर त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. २०११ मध्ये जयललिता यांनी १४ जणांना पक्षातून काढून टाकले होते. नंतर शशिकला यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर २०१२ मध्ये फक्त शशिकला यांना पुन्हा पक्षात घेण्यात आले. मात्र तुरुंगात जाण्याआधी १५ फेब्रुवारी रोजी शशिकला यांनी दिनकरन यांना पुन्हा पक्षात प्रवेश दिला आहे. दिनकरन हे शशिकला यांचे नातेवाईक आहेत.
माजी मुख्यमंत्री ओ. पी. पनीरसेल्वम, ई. मधुसूदनन आणि सी. पोन्नायन यांच्यासारख्या नेत्यांची पक्षाला गरज आहे, असे सांगून ते म्हणाले की, पनीरसेल्वम यांना दिनकरन यांचे पद (उप महासचिव) दिले जावे. (वृत्तसंस्था)

अण्णाद्रमुक पक्ष एका कुटुंबाच्या हातात गेला आहे. जयललिता यांनी ज्यांना पोएस गार्डनमधून बाहेर काढले होते त्यांच्याकडून पक्ष परत आणू. हे धर्मयुद्ध आहे. यात न्यायाचा विजय होईल, अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी नाव न घेता शशिकला यांना पुन्हा लक्ष्य केले.


अम्मांच्या भाचीची नवी राजकीय संघटना
मुख्यमंत्री दिवंगत जयललिता यांची भाची दीपा जयकुमार यांनी शुक्रवारी ‘एमजीआर अम्मा दीपा पेरावाई’ या राजकीय संघटनेची मुहूर्तमेढ रोवून तामिळ राजकारणात उतरण्याचे संकेत दिले. जयललिता यांच्या जयंतीदिनी त्यांनी स्वतंत्र संघटना स्थापन केली. ‘माझा राजकारणातील प्रवास आजपासून सुरू झाला’, असे त्या म्हणाल्या.

‘वेद निलयम’
आमच्या नावावर
जयललिता यांनी त्यांची संपत्ती आपल्या व बहीण दीपा यांच्या नावावर केलेली आहे. यात त्यांच्या पोएस गार्डन स्थित वेद निलयम या बंगल्याचाही समावेश आहे, असे दीपक जयकुमार यांनी सांगितले. जयललिता यांच्यावर उपचार सुरू असताना ६२ दिवस आपण हॉस्पिटलमध्ये होतो, असेही ते म्हणाले.

Web Title: Along with Jayalalitha's niece Panesarelvam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.