संजय राऊतांसोबतच AAP च्या सत्येंद्र जैन यांच्यावरही ईडीची कारवाई; कोट्यवधीची मालमत्ता जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2022 04:42 PM2022-04-05T16:42:40+5:302022-04-05T16:44:19+5:30
ED Action : या प्रकरणात ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यात अकिंचन डेव्हलपर्स (Akinchan Developers) प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स (Indo Metal impex) प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने मोठी कारवाई करत आपचे नेते सत्येंद्र जैन यांचे कुटुंब आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्या पत्नीची कोट्यवधींची मालमत्ता जप्त केली आहे. दोन्ही प्रकरणे भिन्न आहेत ज्यात ईडीने कारवाई केली आहे. यातील एक प्रकरण शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीशी संबंधित आहे, तर दुसरे प्रकरण आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे.
पहिले प्रकरण पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी संबंधित आहे. यामध्ये ईडीने 11 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. यातील 9 कोटींची मालमत्ता प्रवीण राऊत यांच्या मालकीची आहे. त्याचबरोबर २ कोटींची मालमत्ता संजय राऊत यांच्या पत्नीची आहे. 1,034 कोटी रुपयांच्या पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाने शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नीची मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये अलिबागमधील किहीम बीचजवळील भूखंड आणि दादरमधील फ्लॅटचा समावेश असल्याचे सांगण्यात आले.
Enforcement Directorate attached Shiv Sena leader Sanjay Raut's property in connection with Rs 1,034 crore Patra Chawl land scam case, the agency said.
— ANI (@ANI) April 5, 2022
(File pic) pic.twitter.com/ocaQgh2Jnt
याप्रकरणी संजय राऊतचा निकटवर्तीय प्रवीण राऊत यालाही अटक करण्यात आली होती. या प्रकरणी ईडीने गेल्या आठवड्यात आरोपपत्र दाखल केले होते. चौकशीत ईडीला मालमत्तेच्या खरेदीत गुन्ह्याचा मार्ग अवलंबल्याचे आढळून आले होते. दुसरे प्रकरण हे आप नेते सत्येंद्र जैन यांच्या कुटुंबाशी संबंधित आहे. यामध्ये ४.८१ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. हे प्रकरण मनी लाँड्रिंगशी संबंधित आहे. असे सांगण्यात आले आहे की, जैन यांच्या कुटुंबातील सदस्य अशा काही फर्मशी संबंधित आहेत, ज्या फर्मची पीएमएलएअंतर्गत चौकशी सुरू आहे.
या प्रकरणात ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे, त्यात अकिंचन डेव्हलपर्स (Akinchan Developers) प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इम्पेक्स (Indo Metal impex) प्रायव्हेट लिमिटेड इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्याविरुद्ध पीएमएलए अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ED has provisionally attached immovable properties
— ED (@dir_ed) April 5, 2022
worth Rs. 4.81 Crore belonging to M/s Akinchan Developers Pvt. Ltd. ,M/s Indo Metal impex Pvt Ltd & others under PMLA, 2002 in a disproportionate assets case of Satyendra Kumar Jain & others.
संजय राऊत म्हणाले - असत्यमेव जयते
संजय राऊत यांनीही ईडीच्या कारवाईनंतर ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, 'असत्यमेव जयते!!' त्याचवेळी यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी वक्तव्यही केली आहेत. संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना ५५ लाखांचा धनादेश परत केल्याचे ईडीला सांगितले असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवीण आता तुरुंगात आहे, संजय राऊत त्याचे बिझनेस पार्टनर होते का, असा सवाल उपस्थित होत आहे. या प्रकरणात संजय राऊत यांच्या भूमिकेची चौकशी करण्याची मागणी मी ईडीकडे केली होती.
असत्यमेव जयते!!
— Sanjay Raut (@rautsanjay61) April 5, 2022