दोन्ही मुली तरी ६५ % महिला आनंदी, वंशाच्या दिव्यासाठी नाही आग्रही
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 06:06 AM2022-05-08T06:06:54+5:302022-05-08T06:07:11+5:30
राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
नवी दिल्ली : पूर्वी वंशाला दिवा म्हणजे मुलगा हवाच, असा कुटुंबीयांचा आग्रह असायचा. पण आता परिस्थिती बदलत आहे असे दिसते. दोन मुली असलेल्या महिलांपैकी ६५ टक्के महिलांना आपल्याला मुलगा व्हावा, असे अजिबात वाटत नाही. राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या (एनएफएचएस) अहवालात हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. मात्र त्याचवेळी घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागत असलेल्या महिलांच्या संख्येत वाढ झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे. (वृत्तसंस्था)
तंबाखू सेवन करणाऱ्यांत घट
मद्यपान, तंबाखू खाणाऱ्यांच्या संख्येत घट होत आहे. २०१५-१६ मध्ये मद्यपान करणारे २९ टक्के व तंबाखू सेवन करणारे ४५ टक्के होते. २०१९-२१ या कालावधीत मद्यपींची संख्या २२ टक्क्यांपर्यंत व तंबाखू सेवन करणाऱ्यांचा आकडा ३९ टक्क्यांपर्यंत घटला.
९९.५ टक्के महिला सहन करतात अत्याचार
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात ९९.५ टक्के महिला घडलेला प्रकार कुणालाही सांगत नाहीत. तक्रार करण्यासाठी धजावत नाहीत.
ज्यांचे पती मद्यपी आहेत, त्यांच्यापैकी ७० टक्के महिलांना नेहमीच मारहाण होते. २३ टक्के महिलांचे पती मद्यपी नाहीत, तरीही त्यांना मारहाणीला सामोरे जावे लागते.
ज्यांना दोन मुले आहेत अशा महिलांना मुलगी हवी, असे वाटत नाही असे यातून दिसून आले आहे. १५ ते १९ वर्षे वयोगटातील ७०% विवाहित महिलांना दोनपेक्षा अधिक मुले नको असतात. २०१५-१६
या कालावधीत
हे प्रमाण ६८ टक्के होते, असे आढळले आहे.
मायेचा
पदर!
मुलगा असो मुलगी आईचा मायेचा पदर दोघांसाठी सारखाच. ही माऊली आपल्या कडेवर असलेल्या लेकराला आणि शेजारी चालत असलेल्या मुलीला सावली देत स्वत: मात्र उन्हाचे चटके सहन करत चालली आहे. वंशासाठी पोटी दिवा हवाच,
अशी पारंपरिक मानसिकता आता मागे पडत चालली आहे.
(छाया : संजय लचुरिया)