कमाई दिली, पत्नीच्या नावाने जमीन घेतली; नवऱ्याने अपघातात पाय गमावताच 'ती' सोडून गेली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:16 PM2023-08-17T16:16:27+5:302023-08-17T16:18:48+5:30
अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला.
राजस्थानमधील भरतपूरमध्ये ट्रक चालकाच्या पत्नीने त्याला चालता येत नसल्याने सोडून दिलं आहे. अपघातात ट्रक चालकाचे दोन्ही पाय कापले गेले, त्यामुळे त्याला चालता येत नाही. हे प्रकरण डीगजवळील पाडला गावाशी संबंधित आहे. अपघातात व्यक्तीचे दोन्ही पाय निकामी झाले. जेव्हा तो अपंग झाला तेव्हा त्याच्या पत्नी आणि मुलांनी त्याला आपल्यासोबत ठेवण्यास नकार दिला.
मिळालेल्या माहितीनुसार, भरतपूर जिल्ह्यातील डीगजवळील पाडला गावात राहणारा उन्नस काही वर्षांपूर्वी ट्रकचालक होता. तो देशातील एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी माल घेऊन जात असे. तो जे काही कमावायचा ते सर्व पत्नीला द्यायचा. जमीन विकत घेताना त्याने पत्नीच्या नावावर ती खरेदी केली होती. पण 4 वर्षांपूर्वी एक अपघात झाला, ज्यात उन्नसचे दोन्ही पाय कापले गेले. उपचार काही वर्षे चालले
अशा परिस्थितीत पत्नीनेही उन्नसला सोबत ठेवण्यास नकार दिला. उन्नस आता सर्वत्र न्याय मागत आहे. कधी-कधी तो पोलीस अधिकाऱ्यांकडे जातो आणि आपली व्यथा मांडतो. रडत रडत त्याने आपली व्यथा मीडियाला सांगितली. त्याने सांगितले की, 25 वर्षांपूर्वी त्याने कोटाकला गावात जाहिदाशी लग्न केलं होतं. तिला आधीच एक मुलगी होती.
2017 मध्ये त्याचे पाय कापण्यात आले. पाय कापल्यानंतर पत्नीने सोबत राहण्यास नकार दिला. त्याला धक्के मारून घराबाहेर काढण्यात आलं. 10 दिवसांपूर्वी याप्रकरणी नौगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे उन्नसने सांगितले. मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. आता मुलंही साथ देत नाहीत. अपघातानंतर 14 लाख रुपये क्लेम म्हणून मिळाले होते. पत्नीने ते पैसेही हडप केले. जमीन भावाच्या मदतीने विकली. अशा परिस्थितीत उन्नस पोलीस प्रशासनाकडे न्याय मागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.