7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचं लोकेशन सापडलं; प्रियकरासाठी गाठलेलं पाकिस्तान

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 02:24 PM2023-12-06T14:24:49+5:302023-12-06T14:26:01+5:30

अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं.

alwar location of anju fatima found after 7 days inquiry conducted in bhiwadi by police | 7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचं लोकेशन सापडलं; प्रियकरासाठी गाठलेलं पाकिस्तान

7 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अंजूचं लोकेशन सापडलं; प्रियकरासाठी गाठलेलं पाकिस्तान

पतीशी खोटं बोलून चार महिन्यांपूर्वी पाकिस्तानात गेलेली राजस्थानमधील अंजू 29 नोव्हेंबरला पुन्हा भारतात परतली. विवाहित असूनही तिने तिथला प्रियकर नसरुल्लाहसोबत निकाह केला आणि आपलं नाव बदलून फातिमा ठेवलं. ती वाघा बॉर्डरवर परतल्यावर सुरक्षा यंत्रणांनी तिची सखोल चौकशी केली. यानंतर ती कुठे गेली हे कोणालाच माहीत नाही. अंजूचे शेवटचे लोकेशन 30 नोव्हेंबर रोजी दिल्ली होतं. मात्र 7 दिवसांनी अंजू भिवडी, अलवर येथे असल्याचं उघड झालं.

बुधवारी पोलिसांनी अंजूची चौकशी केली. तिचे जबाब नोंदवण्यात आले. अंजूचा पती अरविंद याने भिवडी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. याशिवाय अरविंदने अंजूचा पाकिस्तानी पती नसरुल्लाह याच्याविरुद्धही गुन्हा दाखल केला आहे. 30 नोव्हेंबरपासून अंजू कुठे होती हे कोणालाच माहीत नाही. मात्र आता तो भिवडीमध्ये असून त्याने पोलिसांकडे जबाबही नोंदवला आहे.

अंजूने पंजाबमधील गुप्तचर यंत्रणांना सांगितले होते की, ती केवळ अरविंदपासून घटस्फोट घेण्यासाठी भारतात आली आहे. याशिवाय ती मुलांनाही मिस करत होती. मात्र, अंजूचा पती अरविंद, वडील गयाप्रसाद थॉमस किंवा मुलं तिच्याशी बोलू इच्छित नाहीत. कुटुंबीयांचे म्हणणे आहे की, आता त्यांचा अंजूशी काहीही संबंध नाही.

अरविंद म्हणाला की अंजू तिच्या इच्छेनुसार कुठे जाते याने तिला काही फरक पडत नाही. त्याचवेळी ग्वाल्हेरमध्ये राहणार्‍या अंजूच्या वडिलांनीही सांगितले की, त्यांची मुलगी पाकिस्तानला गेली होती तेव्हाच त्यांच्यासाठी मेली होती. अंजूला भेटायचं नाही असंही मुलं सांगतात.

21 जुलै रोजी गेली पाकिस्तानात 

अंजू 21 जुलै रोजी पाकिस्तानला गेली होती. तिने पती अरविंदला सांगितले होते की, ती फिरण्यासाठी जयपूरला जात आहे. पण त्यानंतर अंजू पाकिस्तानात पोहोचल्याचं समोर आले. हा प्रकार अरविंदला कळताच त्याने अंजूला फोन केला. खोटे बोलण्याचे कारण विचारले. आधी अंजू सांगत राहिली की ती इथे फक्त भेटायला आली आहे आणि दोन चार दिवसात परत येईल. पण असं झालं नाही. प्रसारमाध्यमांद्वारे हे प्रकरण भारतभर पसरले. यानंतर अंजूने नसरुल्लाहसोबत निकाह केल्याचं समोर आलं.
 

Web Title: alwar location of anju fatima found after 7 days inquiry conducted in bhiwadi by police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.