"मला छत्रपती शिवरायांबद्दल आदर अन् मी आई भवानीचा उपासक" - व्यंकय्या नायडू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 03:01 PM2020-07-23T15:01:58+5:302020-07-23T15:43:49+5:30
राज्यसभेतील शपथविधीवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केल्याने समज दिली होती.
नवी दिल्ली - काल राज्यसभेत झालेल्या नवनिर्वाचित सभासदाच्या शपथविधीवेळी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जयजयकार केल्याने समज दिली होती. या प्रकारावरून शिवभक्तांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्यावर टीका करण्यात येत होती. त्या पार्श्वभूमीवर उपराष्ट्रपतींनी आज या या घटनेबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी याबाबत ट्विट केले असून, त्यात ते म्हणाले की, शिवरायांबाबत मला आदर आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अनुयायी आणि आई भवानीचा उपासक आहे. काल राज्यसभेमध्ये शपथविधीवेळी मी जी सूचना केली ती परंपरेला अनुसरून होती. शपथविधीवेळी कुठल्याही घोषणा देण्यात येत नाही. यामध्ये कुणाचाही अवमान करण्याची भावना नव्हती.’’
Always been a strong and vocal admirer of Chhatrapati Shivaji Maharaj and worshipper of Goddess Bhawani.
— M Venkaiah Naidu (@MVenkaiahNaidu) July 23, 2020
Reminded Members that as per conventional practice at the time of taking oath, no slogans are given.
No disrespect at all.
राज्यसभेमधील नवनिर्वाचित सभासदांचा शपथविधी काल राज्यसभेमध्ये झाला. यावेळी महाराष्ट्रातील नवनिर्वाचित राज्यसभा खासदार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, आरपीआयचे रामदास आठवले, भाजपा नेते उदयनराजे भोसले, भागवत कराड, काँग्रेस नेते राजीव सातव आणि शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी यांनीही खासदारकीची शपथ घेतली. राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. दरम्यान, भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी…जय शिवाजी’ असा जयघोष केला. मात्र त्यानंतर व्यंकय्या नायडू यांनी आपल्या चेंबरमध्ये अशा घोषणा देऊ नयेत, अशी समज दिली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस
घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
धक्कादायक! कोरोनाच्या संसर्गापासून वाचवण्यासाठी ५० हून अधिक मुलांना पाजली देशी दारू
नवीन नोकरी शोधताय? मग अजिबात करू नका या चुका, अन्यथा येईल पश्चातापाची वेळ
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी