यावल, रावेरमध्ये जलपातळीत मोठी घट अमळनेरचा जलसाठा तीन मिटर घटला : भूजल सर्वेक्षण विभागाने केले १७८ विहिरींचे निरीक्षण
By admin | Published: May 11, 2016 12:26 AM2016-05-11T00:26:30+5:302016-05-11T00:26:30+5:30
जळगाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.
Next
ज गाव : अत्यल्प पाऊस, मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड या सार्याचा परिणाम म्हणून अमळनेर, धरणगाव व चाळीसगाव या तीन तालुक्यातील भूगर्भातील जलपातळी तब्बल तीन मिटरने खालावली आहे. सहा तालुक्यांमध्ये सातत्याने भूजलपातळीत घट होत असल्याने आगामी काळात भीषण स्थिती ओढवणार आहे.भूजल सर्वेक्षण विभाग कार्यालयामार्फत तालुकानिहाय विहिरींचे निरीक्षण करण्यात येत असते. सप्टंेबर महिन्यातील अहवालानंतर या कार्यालयाने जानेवारी महिन्याच्या अखेर प्रत्येक तालुक्यातील विहिरीचे निरीक्षण करून भूगर्भातील जलपातळीची मोजणी केली आहे.अमळनेर, चाळीसगाव व धरणगावात धोक्याची घंटाभूजल सर्वेक्षण विभागातर्फे अमळनेर तालुक्यातील १४, चाळीसगाव तालुक्यातील २१ व धरणगाव तालुक्यातील सात तर पारोळा तालुक्यातील १६ विहिरींचे निरीक्षण करण्यात आले. या चारही तालुक्यांमध्ये अडीच ते तीन मीटरपर्यंत जलपातळीतील घट नोंदविण्यात आली आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या मोजणीत बोदवड तालुक्यात सर्वाधिक अडीच मीटरने जलपातळीत घट झाल्याची नोंद होती. त्यापाठोपाठ अमळनेर व चाळीसगाव तालुक्यात दीड मीटरने जलपातळीत घट झाली होती. चोपडा, यावल व रावेरला मोठा फटका ४ सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसामुळे यावल, रावेर, चोपडा व भुसावळ तालुक्यांना दिलासा मिळाल्याने या तालुक्यातील जलपातळीत काही प्रमाणात वाढ झाली होती. पावणे तीन मिटरने यावल तालुक्यातील वाढ नोंदविण्यात होती. मात्र प्रचंड उपसा केल्यामुळे यावल तालुक्यात २.७७ मीटरने जलपातळीत घट झाली आहे. चोपडा तालुक्यात २.५१ मीटरने तर रावेर तालुक्यात १.१६ मीटरने भूगर्भातील जलपातळीत घट झाली आहे. या तालुक्यांमध्ये पाण्याचा प्रचंड उपसा होत असल्याने जलपातळीत घट होत आहे. मुक्ताईनगर व भुसावळात अत्यल्प घटजिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये भूजलपातळीत घट होत असताना मुक्ताईनगर, भुसावळ व एरंडोल तालुक्यात काहीशी स्थिती चांगली आहे. भुसावळ तालुक्यात ०.८८, मुक्ताईनगर तालुक्यात ०.९६ तर एरंडोल तालुक्यात १.०७ मीटरने भूजलपातळीतील घट नोंदविली आहे. ४भूजल सर्वेक्षण विभागाच्या प्रमुख डॉ.अनुपमा पाटील व त्यांच्या सहकार्यांनी जिल्हाभरातील १७८ विहिरींचे सर्वेक्षण केले. भूजलपातळीची मोजणी करताना जानेवारी २०११ व जानेवारी २०१६ या महिन्यातील भूजलपातळीचा तुलनात्मक अभ्यास करून तालुकानिहाय वाढीचा किंवा घट झाल्याचा अहवाल तयार केला आहे. पाच वर्षात सरासरी पाणी पातळीचीदेखील नोंद केली आहे.