जबरदस्त! 30 लाखांचं पॅकेज सोडून तरुणाने सुरू केली स्ट्रॉबेरीची शेती; आता होतेय बंपर कमाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:10 AM2023-03-09T11:10:27+5:302023-03-09T11:12:19+5:30
Aman Kumar : स्ट्रॉबेरीची लागवड सामान्य शेतकऱ्याने नाही तर सॉफ्टवेअर इंजिनिअरने केली आहे.
सर्वसाधारणपणे, स्ट्रॉबेरीची लागवड फक्त डोंगराळ भागात आणि थंड प्रदेशात केली जाते. मात्र, आता बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील दियारा भागातील रामदीरी गावातही स्ट्रॉबेरीची शेती करण्याची सुरुवात झाली आहे. विशेष म्हणजे स्ट्रॉबेरीची लागवड सामान्य शेतकऱ्याने नाही तर सॉफ्टवेअर इंजिनिअरने केली आहे. अमन कुमार असं या सॉफ्टवेअर इंजिनिअरचं नाव आहे
सॉफ्टवेअर इंजिनिअर अमन कुमार याने सांगितले की, लॉकडाऊनमुळे कंपनीची परिस्थिती ठीक नसल्याने तो नोकरी सोडून घरी आला. रिकाम्या वेळेत त्याने Youtube वर स्ट्रॉबेरीची लागवड कशी करावी ते पाहिलं. यानंतर त्यांनी स्वत: उत्पादन करण्यास सुरुवात केली. तसेच मी माझ्या वडिलोपार्जित जमिनीवर स्ट्रॉबेरीची लागवड सुरू केली असल्याचेही त्यांनी सांगितले.
अमन कुमारने दिलेल्या माहितीनुसार, तो सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. स्ट्रॉबेरीची लागवड करण्यापूर्वी तो राजस्थानमधील एका खासगी कंपनीत वार्षिक 30 लाखांच्या पॅकेजवर काम करत होता. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे कंपनीची अवस्था इतकी बिकट झाली की, नोकरी सोडून घरी परतावे लागले. यानंतर त्याने बिहार येथे स्ट्रॉबेरीची लागवड करणाऱ्या ब्रिज किशोर प्रसाद सिंह यांच्याकडून प्रशिक्षणही घेतले.
महाराष्ट्रातील महाबळेश्वर येथून स्ट्रॉबेरीची रोपेही मागवली. अमन कुमारने सांगितले की, सध्या 2 एकर जमिनीत स्ट्रॉबेरीची लागवड करून महिन्याला 3 लाखांपर्यंत नफा कमावत आहे. तसेच स्ट्रॉबेरीची लागवड करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांना मदती सोबतच योग्य प्रशिक्षणही देईल, असेही सांगितले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"