आम आदमी पक्षाला आणखी एक झटका; ED ने आमदार अमानतुल्ला खान यांना घेतले ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 10:08 PM2024-04-18T22:08:22+5:302024-04-18T22:10:18+5:30
Amanatullah Khan Arrested: दिल्ली वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्याप्रकरणी अमानतुल्ला खान यांना अटक झाली आहे.
Amanatullah Khan Arrested : गेल्या काही दिवसांपासून एका पाठोपाठ एक धक्का खाणाऱ्या आम आदमी पक्षाला (aap) आज आणखी एक मोठा धक्का बसला आहे. वक्फ बोर्ड नियुक्ती घोटाळ्याच्या आरोपाखाली अंमलबजावणी संचालनालयाने(ED) ओखलाचे आमदार अमानतुल्ला खान (Amanatullah Khan) यांना अटक केली आहे. अटकेपूर्वी ED च्या पथकाने अमानतुल्ला यांची सुमारे साडेनऊ तास चौकशी केली.
आमदार अमानतुल्ला खान यांच्यावर वक्फ बोर्डात 32 जणांची बेकायदेशीरपणे नियुक्ती करणे, बोर्डाच्या अनेक मालमत्ता बेकायदेशीरपणे भाड्याने देणे आणि निधीचा गैरवापर केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी ते ईडीसमोर हजर झाले होते. तसेच, त्यांची सकाळपासून चौकशी सुरू होती. चौकशीनंतर ईडीने त्याला अटक केली. दरम्यान, अमानतुल्ला यांच्या अटकेची बातमी मिळताच आप नेते संजय सिंह आणि मंत्री आतिशी अमानतुल्ला खान त्यांच्या घरी पोहोचले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सप्टेंबर 2022 मध्ये अमानतुल्ला यांची चौकशी केली होती. या आधारे एसीबीने चार ठिकाणी छापे टाकून सुमारे 24 लाखांची रोकड जप्त केली होती. याशिवाय दोन बेकायदेशीर व विना परवाना पिस्तूल, काडतुसे आणि दारुगोळाही जप्त करण्यात आला होता. यानंतर अमानतुल्ला यांना अटक करण्यात आली. पण, 28 डिसेंबर 2022 रोजी त्यांची जामिनावर सुटका झाली.
मोदी सरकार ऑपरेशन लोटस पूरी तरह जुट गई है मंत्रियों विधायकों पर फर्जी मामले बनाकर उनको गिरफ़्तार किया जा रहा है।@KhanAmanatullah के विरुद्ध बेबुनियाद मामला बनाकर ED द्वारा ने उनको गिरफ़्तार करने की तैयारी की जा रही है।
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) April 18, 2024
तानाशाही का अंत जल्द होगा।
मैं उनके परिवार से मिलने जा रहा…
संजय सिंह यांची टीका
अमानतुल्ला खान यांच्या अटकेनंतर राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी X वर पोस्ट करत मोदी सरकारवर निशाणा साधला. 'मोदी सरकार ऑपरेशन लोटसमध्ये गुंतले आहे. खोटे केसेस दाखल करुन मंत्री आणि आमदारांना अटक केली जात आहे. अमानतुल्ला खान यांच्यावर चुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच हुकूमशाहीचा अंत होणार.