वडील वनवासात व मुलगा राज्यात, सपातील 'दंगल'वर अमर सिंहांची टीका

By admin | Published: December 31, 2016 12:00 PM2016-12-31T12:00:37+5:302016-12-31T12:28:37+5:30

'कलीयुगात पिता वनवासात आणि मुलगा राज्य करेल, हे कधीही स्वीकारार्ह नाही', अशी प्रतिक्रिया अमर सिंह यांनी समाजवादी पक्षात सुरू असलेल्या 'दंगल'वर दिली आहे.

Amar Singh's comment on father's father's death | वडील वनवासात व मुलगा राज्यात, सपातील 'दंगल'वर अमर सिंहांची टीका

वडील वनवासात व मुलगा राज्यात, सपातील 'दंगल'वर अमर सिंहांची टीका

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 31 - 'कलीयुगात पिता वनवासात आणि मुलगा राज्य करेल, हे कधीही स्वीकारार्ह नाही', अशी प्रतिक्रिया अमर सिंह यांनी समाजवादी पक्षात सुरू असलेल्या 'दंगल'वर दिली आहे. अखिलेश यादव यांना समाजवादी पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित करण्यात आल्यानंतर अमर सिंह यांनी पहिल्यांदाच यादव-पिता पुत्राच्या वादावर भाष्य केले आहे.  यावेळी त्यांनी जाहीरपणे अखिलेश यांना विरोध दर्शवत मुलायमसिंह यांचे समर्थन केले आहे.  
 
अमर सिंह यांनी मुलायमसिंह यांना समर्थन देत सांगितले की, मुलायमसिंह यांचा अनादर करणे पक्षाची शिस्तभंग करण्यासमान आहे. मुलायमसिंह यांच्याविरोधात जे कोणी काम करत आहेत, ते पूर्णपणे घटनाबाह्य, अनैतिक आणि चुकीचे आहे, असे म्हणत त्यांनी अखिलेश यांच्यावर टीका केली आहे.
(यादव पिता-पुत्राची 'दंगल' नियोजित? व्हायरल ई-मेलवरुन सवाल)
 
उत्तर प्रदेशमधील सत्ताधारी समाजवादी पक्षात शुक्रवारी फूट पडल्याचे पाहायला मिळाले. पक्षाचे सर्वेसर्वा मुलायमसिंह यादव यांनी आपला मुलगा व मुख्यमंत्री अखिलेश यादव यांना पक्षातून 6 वर्षांसाठी निलंबित केले. यादव घराण्यातील ही दंगल समोर आल्यानंतर पक्षातही दुफळी निर्माण झाली असून मुलायमसिंह की अखिलेश यादव? कुणाला समर्थन द्यायचे? यावरुन कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. 
(उत्तर प्रदेशात यादवी!)
सपा प्रवक्त्या जुही सिंह यांनी सांगितले की, मुख्यमंत्री निलंबित झाल्यानंतर 'प्रवक्तेपद सोडणे ही माझी जबाबदारी आहे. आम्ही मुलायमसिंह यांच्याविरोधात नाही, मात्र आम्ही मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत आहोत'. तर, 'समाजवादी पक्षातील गुंडवादी तत्वे आता हळूहळू दूर होत असून अखिलेश आता स्थापित नेता म्हणून समोर येत आहे', अशी प्रतिक्रिया भाजपाचे खासदार सत्यपाल सिंह यांनी दिली आहे.  शिवाय हे कौटुंबिक नाटक दिसत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. 
 

Web Title: Amar Singh's comment on father's father's death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.