पंजाबमध्ये अमरिंदरसिंग सरकार सत्तेवर

By admin | Published: March 17, 2017 12:47 AM2017-03-17T00:47:57+5:302017-03-17T00:47:57+5:30

काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबत नवजोतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला

Amarinder Singh in power in Punjab | पंजाबमध्ये अमरिंदरसिंग सरकार सत्तेवर

पंजाबमध्ये अमरिंदरसिंग सरकार सत्तेवर

Next

चंदीगड : काँग्रेसला पंजाबमध्ये विजयपथावर नेणारे कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी गुरुवारी राज्याचे २६वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्या सोबत नवजोतसिंग सिद्धू व इतर आठ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. पतियाळा राजघराण्याचे वंशज असलेले अमरिंदरसिंग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
माजी क्रिकेटपटू सिद्धू यांना उपमुख्यमंत्रिपद दिले जाईल, अशी अटकळ होती. तथापि, मंत्र्यांच्या यादीत त्यांचे नाव दुसऱ्या क्रमांकावर होते. अमरिंदर यांच्यानंतर ब्रह्म मोहिंद्रा यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर सिद्धूंना आमंत्रित करण्यात आले.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित असलेल्या या सोहळ्यात दोन महिला आमदारांना राज्यमंत्रिपदाची शपथ देण्यात आली. राज्यपाल व्ही.पी. सिंग बदनोरे यांनी गोपनीयतेची शपथ दिली सिद्धूसह मनप्रीतसिंग बादल, साधुसिंग धरमसोट, तृप्त राजिंदरसिंग बाजवा, राणा गुरजितसिंग व चरणजितसिंग चन्नी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. अरुणा चौधरी आणि रझिया सुल्ताना अशा ९ जणांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. (वृत्तसंस्था)


अमरिंदर यांच्याकडे सामान्य प्रशासन, कार्मिक, गृह, न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्याकडे नसलेल्या खात्याचा कार्यभार राहील. मनप्रीत बादल पंजाबचे नवे अर्थमंत्री असतील.
मोहिंद्रा यांच्याकडे आरोग्य आणि कुटुंब कल्याण, विधिमंडळ कामकाज, संशोधन आणि वैद्यकीय शिक्षण, सिद्धूंकडे स्थानिक स्वराज संस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक व्यवहार ही खाती
देण्यात आली आहेत.

Web Title: Amarinder Singh in power in Punjab

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.