Amarnath Cave Cloudburst: अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू, अनेक बेपत्ता; हेल्पलाईन नंबर जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 10:08 PM2022-07-08T22:08:45+5:302022-07-08T22:09:28+5:30
Amarnath Cloudburst Update: अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
अमरनाथ यात्रेवेळी हजारो भाविकांची गर्दी असताना गुफेजवळील भागात मोठी ढगफुटी झाली. यात्रेकरूंच्या टेंट असलेल्या क्षेत्रात माती, दगडांचा मोठा लोंढा आला आणि अनेक टेंट वाहून गेले. यामध्ये आतापर्यंत १३ जणांचे मृतदेह सापडले आहेत. शोधकार्य जोरात सुरु असून एनडीआरएफसह आर्मीच्या रेस्क्यू टीम श्वानपथकांसह काम करत आहेत.
अमरनाथ यात्रा आयोजकांनी देखील या घटनेची पुष्टी केली आहे. अमरनाथ गुहेजवळ १० ते १२ हजार भाविक आहेत. सायंकाळी साडे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. स्थानिकांनी अनेक जण वाहून गेल्याचे म्हटले आहे. भाविकांचे, सुरक्षा दलाचे आणि खानपानाचे टेंट वाहून गेल्याचे म्हटले आहे. जवळपास २५ तंबू वाहून गेले आहेत.
अमरनाथ यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आले आहेत.
NDRF: 011-23438252, 011-23438253
Kashmir Divisional Helpline: 0194-2496240
Shrine Board Helpline: 0194-2313149 असे हे नंबर आहेत.
एनडीआरएफच्या मदतीला हवाई दलाने हेलिकॉप्टर आणि वैद्यकीय पथके पाठविण्याची तयारी केली आहे. जखमी यात्रेकरूंना हेलिकॉ़प्टरद्वारे एअरलिफ्ट केले जाणार आहे. पुढच्या आदेशांची वाट पाहत असल्याचे एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. १० आर्मीची पथके तैनात करण्य़ात आली आहेत.
अमरनाथ ढगफुटी: 13 यात्रेकरूंचा मृत्यू. अनेक बेपत्ता. हेल्पलाईन नंबर जारी. https://t.co/CbvSFUBywh#AmarnathYatra#Amarnathcloudburst#cloudburstpic.twitter.com/lqqIgi3S5Q
— Lokmat (@lokmat) July 8, 2022