अमरनाथ यात्रेवर दहशतवादाचं सावट
By admin | Published: June 6, 2017 08:58 AM2017-06-06T08:58:52+5:302017-06-06T08:58:52+5:30
काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
श्रीनगर, दि. 6- काश्मिरमध्ये सध्या सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमिवर पुन्हा एकदा सैन्यदलासमोर अमरनाथ यात्रेचं आव्हान समोर उभं राहत आहे. सध्यातरी अधिकृतपणे यात्रेच्या दरम्यान कोणताही धोका नसल्याचं बोललं जात आहे. पण जर सुरक्षा व्यवस्थेमध्ये जराही हलगर्जी झाली तर यात्रेवरसुद्धा दहशतवादी हल्ला होऊ शकतो , असं सुरक्षा दलाचं मत आहे. जम्मू-काश्मिर सरकारने अमरनाथ यात्रेच्या संपूर्ण मार्गाला अतीसंवेदनशील घोषित केलं आहे. तसंच भाविकांच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याचे आदेशसुद्धा सरकारने सैन्य दलाला दिले आहेत.
अमरनाथ यात्रेच्या सुरक्षेसाठी जम्मू-काश्मिर सरकारने महत्त्वाचे निर्देश काढले आहेत. लष्कर, पोलीस आणि इतर सुरक्षा दलांना सावध राहण्याचे आदेश देण्यात आलेत. 29 जूनपासून सुरू होणाऱ्या यात्रेच्या सुरक्षेची खात्री केली जाते आहे. तसंच गुप्तचर संस्था आणि एकिकृत मुख्यालयातून मिळणाऱे आदेश आणि माहिती याची चाचपणी करण्याचं सांगण्यात आलं आहे. यामुळे कुठल्याही संभाव्य दुर्घटनेला रोखता येइल.
अमरनाथ यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी श्राइन बोर्डाकडून लाखो लोकांना निमंत्रण पाठविण्यात आलं आहे.आत्तापर्यंत दोन लाख लोकांची नोंदणी झाली आहे. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. एकढ्या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या लोकांना सांभाळण्याचं आव्हान आता सैन्यदलासमोर आहे. याधी अनेक वेळा सैन्यदलाला धुत बनवत दहशतवाद्यांनी हल्ले केले आहेत.
29 जूनपासून अमरनाथ यात्रा सुरू होते आहे. तर 7 ऑगस्ट म्हणजेच रक्षाबंधनाच्या दिवशी यात्रेचा समारोप होणार आहे. या यात्रेमध्ये तेरा वर्ष वयापेक्षा कमी आणि 75 वर्ष वयापेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्ती सहभाग घेऊ शकणार नाही. तसंच गरोदर महिलांनासुद्धा यात्रेत सहभाग घेता येणार नाही. यंदाच्या यात्रेसाठी तब्बल 37 हजार सैनिक तैनात करण्यात आले आहेत. गेल्या यात्रेत भाविकांना ज्या समस्यांना सामोरं जावं लागलं होतं यंदा त्या गोष्टी घडू नये यासाठी प्रयत्न केले जातील, असं गृहमंत्रालयाकडून सांगण्यात आलं आहे. नोंदगी न करता यात्रेमध्ये भाविकांना सहभाग घेता येणार नाही.