Amarnath Yatra : बलाटल मार्गावर दरड कोसळून 5 भाविकांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2018 12:29 PM2018-07-04T12:29:03+5:302018-07-04T12:44:50+5:30
जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
श्रीनगर - अतिवृष्टी व खराब हवामानामुळे अमरनाथ यात्रा थांबवण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये अमरनाथच्या यात्रेदरम्यान बलाटल मार्गावरील ब्रारीमार्ग येथे मंगळवारी (3 जुलै) दरड कोसळली. या घटनेत 5 भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून पहलगाम आणि बलाटल बेस कॅम्प येथे लष्कराकडून यात्रा थांबवण्यात आली आहे. यापूर्वीही बलाटलला जाणाऱ्या रस्त्यावर अतिवृष्टी झाल्यामुळे या भाविकांना 28 जूनला बलाटल बेस कॅम्पजवळ थांबवण्यात आले होते.
दरम्यान, वाढत्या दहशतवादी कारवायांच्या पार्श्वभूमीवर लष्कराने अमरनाथ यात्रेदरम्यान कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.
Five people were killed and three injured after a landslide hit Brarimarg on the Baltal route
— ANI Digital (@ani_digital) July 3, 2018
Read @ANI Story | https://t.co/kfjYCrOaYNpic.twitter.com/oUpJMI0Q0P
11 भाविकांचा झाला मृत्यू
अमरनाथ गुफा मंदिराकडे जाणाऱ्या मार्गावर झालेल्या भूस्खलनात 5 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तर तीन जण गंभीर जखमी झालेत. दरम्यान, यंदा यात्रा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 11 भाविकांचा मृत्युमुखी पडले आहेत.
We are trying to restore the track as soon as possible. There is no report of any person missing. Rescue and evacuation operation has been completed: Dr Piyush Singla, Deputy Commissioner, Ganderbal on landslide that occurred yesterday on Baltal route to #Amarnath Cave shrine pic.twitter.com/gM84DPEtqa
— ANI (@ANI) July 4, 2018
#JammuAndKashmir: Visuals of #AmarnathYatra pilgrims who were injured in landslide on Baltal route last night. pic.twitter.com/HQOgBFZm7m
— ANI (@ANI) July 4, 2018