21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 04:26 PM2020-07-06T16:26:59+5:302020-07-06T18:06:29+5:30

जोपर्यंत भाविकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे लागणार आहे.

amarnath yatra will start from 21 july in corona protocol | 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी 

21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होणार? केवळ दहा हजार भाविकांना परवानगी 

googlenewsNext
ठळक मुद्देएका दिवसात केवळ 500 भाविकांना गुहेत जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. हेलिकॉप्टरने यात्रा करण्याचाही विचार केला जात आहे, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

नवी दिल्ली : येत्या 21 जुलैपासून अमरनाथ यात्रा सुरू होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांच्या रिपोर्टनुसार, बाबा बर्फानीची यात्रा प्रवास सुरू होणे अपेक्षित आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ 10,000 भाविकांना यात्रा करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षेची पूर्ण व्यवस्था केली जात आहे.

यावेळी फक्त बालटाल मार्गावरुन अमरनाथ यात्रा असणार आहे, असे सांगण्यात येत आहे. हेलिकॉप्टरने यात्रा करण्याचाही विचार केला जात आहे, परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एका दिवसात केवळ 500 भाविकांना गुहेत जाण्यास परवानगी देण्यात येणार आहे. बाहेरून येणाऱ्या यात्रेकरूंना कोरोनाची चाचणी करावी लागणार आहे.

जोपर्यंत भाविकांचा कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह येत नाही, तोपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटरमध्ये राहावे लागणार आहे. तसेच, यात्रेसाठी फक्त 55 वर्षापेक्षा कमी वयाच्या भक्तांना परवानगी देण्याची शक्यता आहे. ऑनलाईन नोंदणीची व्यवस्था करता येऊ शकते. याशिवाय, जवळपास 2 आठवड्यांची अमरनाथ यात्रा असेल म्हणजेच 3 ऑगस्टपर्यंत यात्रा असणार आहे, असे सांगण्यात येत आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंची काठुआ येथील लखनपूर येथे कोरोना चाचणी होणार आहे. तसेच, वृद्ध लोकांना प्रवासात जाण्यापासून रोखले जाऊ शकते. लखनपूरमध्ये येणाऱ्या भाविकांची कोरोना चाचणी, राहण्याची आणि खाण्या-पिण्याची सोय करण्यासाठी प्रशासनाची तयारी सुरु आहे.

दरम्यान, जम्मूमध्ये कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन अमरनाथ यात्रेच्या 'यात्री निवास भवन'चे रुपांतर क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे. मात्र, आता ते यात्रेकरूंसाठी तयार केले जाणार आहे. भाविकांची राहण्याची व्यवस्था होईल, या दृष्टीने 'यात्री निवास भवन' पूर्णपणे स्वच्छ करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.

आणखी बातम्या...

अवघ्या ५ वर्षांच्या दिव्यांगाने १० किमी चालून रुग्णालयासाठी जमवला ९ कोटींचा निधी

Aadhaar-PAN Card Link: आधार-पॅन लिंक करण्याची डेडलाइन वाढवली; आता 'या' तारखेपर्यंत करू शकता

"हुकुमशाही कोणाची होती, हे भाजपाच्या नेत्यांना खासगीत विचारा, ते सांगतील"

चीनला पुन्हा झटका, भारतानंतर आता 'हा' देश टिकटॉवर बंदी घालण्याच्या तयारीत

Web Title: amarnath yatra will start from 21 july in corona protocol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.