भारतीय लष्कराची जबरदस्त कामगिरी! १५००० फूट उंचीवर जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल पोहोचवले
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 10:36 PM2024-08-17T22:36:05+5:302024-08-17T22:42:28+5:30
भारतीय लष्कराने एका महत्त्वपूर्ण पॅरा-ड्रॉप ऑपरेशनमध्ये जगातील पहिले पोर्टेबल हॉस्पिटल १५,००० फूट उंचीवर असलेल्या हॉस्पिटलमध्ये पोहोचवून इतिहास रचला. लष्कर आणि हवाई दलाने संयुक्त कारवाई केली.
हवाई दल आणि लष्कराने मिळून पॅरा-ड्रॉप ऑपरेशनमध्ये आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब अंदाजे १५,००० फूट उंचीवर पोहोचवले. आरोग्य मैत्री क्यूब हे जगातील पहिले एअर लिफ्टेड पोर्टेबल हॉस्पिटल आहे.
संरक्षण मंत्रालयाने दिलेली माहिती अशी, हे अशा प्रकारचे पहिले अचूक पॅरा-ड्रॉप ऑपरेशन आहे. हे भीष्म प्रकल्प अंतर्गत विकसित केले आहे. या ऑपरेशनने डोंगराळ भागातही प्रभावी मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण कार्य करण्याची क्षमता दाखवून दिली आहे.
"ममता बॅनर्जींचा लक्ष हटवण्याचा प्रयत्न, राजीनामा द्यावा"; निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया
यशस्वी पॅरा-ड्रॉपने सशस्त्र दलांचे समन्वय आणि वेळेवर आणि प्रभावी मदत देण्याची त्यांची क्षमता देखील दाखवली आहे. वायुसेनेने क्यूबला एअरलिफ्ट करण्यासाठी आणि अचूकपणे पॅरा-ड्रॉप करण्यासाठी C-130J सुपर हर्क्युलस हे प्रगत रणनीतिक वाहतूक विमान वापरले. लष्कराच्या पॅरा ब्रिगेडने अत्याधुनिक प्रिसिजन ड्रॉप उपकरणे वापरून क्यूब टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
हे पोर्टेबल हेल्थ क्यूब्स आपत्कालीन परिस्थितीत उपयुक्त ठरू शकतात. आरोग्य मैत्री क्यूब्स ७२ क्यूब्सचे बनलेले आहेत. हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, पोर्टेबल हॉस्पिटलमध्ये दोन मास्टर क्यूब्स असतात, प्रत्येकामध्ये ३६-३६ मिनी क्यूब्स असतात. त्याचे वजन ७२० किलो आहे. आवश्यक असल्यास, मानवतावादी मदत आणि आपत्ती निवारण फक्त १२ मिनिटांत बाधित भागात एअरलिफ्ट केले जाऊ शकते. हवाई दलाने नुकतीच आग्रा येथील भीष्म पोर्टेबल हॉस्पिटलची चाचणी घेतली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी २०२३ मध्ये ग्लोबल साउथ समिटमध्ये 'आरोग्य मैत्री' प्रकल्पाची घोषणा केली होती. या अंतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटांमुळे प्रभावित झालेल्या कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक वैद्यकीय पुरवठा करेल. हे प्रगत वैद्यकीय सुविधांनी सुसज्ज आहे, यामध्ये ऑपरेशन थिएटर, एक्स-रे मशीन, रक्त तपासणी उपकरणे, व्हेंटिलेटर, जनरेटर, स्ट्रेचर, मॉड्यूलर वैद्यकीय उपकरणे आहेत. गोळीबार, भाजणे, शस्त्रक्रिया आणि फ्रॅक्चरमुळे झालेल्या जखमींना हे उपयुक्त आहेत. या क्यूबद्वारे २०० हून अधिक रुग्णांवर उपचार केले जाऊ शकतात.
Showcasing jointness, #IndianAirForce & #IndianArmy conducted first-of-its-kind paradrop of indigenously-made world's 1st portable hospital at 15,000ft elevation. Aarogya Maitri Health Cube is part of BHISHM (Bharat Health Initiative for Sahyog, Hita & Maitri) to enhance HADR… pic.twitter.com/4gz7pH46cq
— A. Bharat Bhushan Babu (@SpokespersonMoD) August 17, 2024