आश्चर्यकारक! ७३ तासांत ७ खंडांचा प्रवास; दोन भारतीयांनी केला विश्वविक्रम...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2023 07:52 AM2023-01-12T07:52:45+5:302023-01-12T07:53:50+5:30

डॉ. अली इराणी आणि सुजॉय कुमार मित्रा यांनी सातही खंडांचा सर्वात वेगवान प्रवास करण्याचा पूर्वीचा विक्रम मोडला.

Amazing! Travel 7 continents in 73 hours; Two Indians broke the world record... | आश्चर्यकारक! ७३ तासांत ७ खंडांचा प्रवास; दोन भारतीयांनी केला विश्वविक्रम...

आश्चर्यकारक! ७३ तासांत ७ खंडांचा प्रवास; दोन भारतीयांनी केला विश्वविक्रम...

googlenewsNext

नवी दिल्ली : वाचकांनी ज्युल्स व्हर्नची कादंबरी ‘अराउंड द वर्ल्ड इन ८० डेज’ वाचली असेलच. त्यावेळी वाटत होते की खरोखर हे शक्य आहे का, पण दोन भारतीयांनी अवघ्या ७३ तासांत सात खंडांना भेट देऊन गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवले आहे.

डॉ. अली इराणी आणि सुजॉय कुमार मित्रा यांनी सातही खंडांचा सर्वात वेगवान प्रवास करण्याचा पूर्वीचा विक्रम मोडला. त्यांनी हा विक्रम ३ दिवस, १ तास, ५ मिनिटे आणि ४ सेकंदात केला. डॉ इराणी आणि मित्रा यांनी ४ डिसेंबर रोजी अंटार्क्टिका येथून प्रवास सुरू केला. ते ७ डिसेंबर रोजी ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरात पोहोचले.

‘रेकॉर्ड मोडण्यासाठी  असतात’

आज आपण एक विक्रम मोडण्यात यशस्वी होऊ शकतो. उद्या कोणीतरी आमचा विक्रम मोडेल, असे सुजॉय आणि डॉ. अली यांनी सांगितले. डॉ. अली यांनी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्रही पोस्ट केले आहे.

Web Title: Amazing! Travel 7 continents in 73 hours; Two Indians broke the world record...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत