अश्लील अॅश ट्रेमुळे अमेझॉन पुन्हा वादात
By admin | Published: June 7, 2017 10:33 AM2017-06-07T10:33:19+5:302017-06-07T10:34:44+5:30
ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन पुन्हा एकदा वादात आली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.7- ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट अमेझॉन पुन्हा एकदा वादात आली आहे. अमेझॉनचा हा नवा वाद एका अॅश ट्रेमुळे निर्माण झाला आहे. अमेझॉनवर विकायला ठेवलेला हा अॅश ट्रे अत्यंत आक्षेपार्ह आणि अश्लील आहे. नग्नावस्थेतील महिलेची प्रतिकृती असलेलं डिझाइन या अॅश ट्रेचं बनविण्यात आलं आहे. अमेझॉनवर या वेबसाइटवर अशा प्रकारचं डिझाइन असलेले मेटल आणि चिकण माती असे दोन प्रकारातील अॅश ट्रे विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्यापैकी मेटलच्या ट्रेची किंमत तब्बल 4441 रूपये तर चिकण मातीच्या ट्रेची किंमत 299 रूपये आहे. अमेझॉनवरची ही वस्तू काही वेळातच सोशम मीडियावर व्हायरल झाली होती. अमेझॉन विरत असलेल्या या ट्रेवर बंदीची मागणीसुद्धा नेटीझन्सने केली आहे.
सोशल मीडियावर या संदर्भातील तीव्र प्रतिक्रिया उमटायला सुरूवात झाली आहे. फेसबुकवर गीता यथार्त या महिलेने अमेझॉनवर आक्षेप घेत पोस्ट शेअर केली आहे. "ज्या देशात दररोज प्रत्येक तासाला लहान मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यत प्रत्येक स्त्रीकडे वाईट नजरेने बघणारे पुरूष आहेत. जिथे प्रत्येक तासाला एक तरी बलात्काराची घटना ऐकु येते. मुलींवर क्रुरतेने अत्याचार करून त्यांना मारलं जातं, त्याच देशात अशा प्रकारचं बाजारीकरण बाढतं आहे. बलात्कार करणाऱ्या पुरूषांना अमेझॉन गिफ्ट देतं आहे. पैसे कमवायची या पेक्षा वाईट पद्धत सुचली नाही का ? असा प्रश्न गीता या महिलेने फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विचारला आहे.
सोशल मीडियामधून टीकेची झोड उठू लागल्यावर अमेझॉनने त्या अॅश ट्रेला साइटवरून काढून टाकलं आहे. अमेझॉनकडून अशा प्रकारची चूक पहिल्यांदा झालेली नाही. याआधीसुद्धा एका वस्तूवरून खूप वाद झाला होता. तिरंग्याचं चित्र असलेला डोअर मॅट अमेझॉनने विकायला ठेवला होता. यावर भारत सरकारने तीव्र आक्षेप घेतला होता. परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी खडसावल्यानंकर अमेझॉनच्या कॅनडा वेबसाइटवरून त्या वस्तूला हटविण्यात आलं होतं. तसंच अमेझॉनकडून या वादासाठी माफी मागण्यात आली होती. तसंच महात्मा गांधी यांचा फोटो छापलेल्या चपला अमेझॉनने आणल्या होत्या. यावरून अमेझॉनवर टीका झाली होती.