ऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2022 10:10 PM2022-09-30T22:10:11+5:302022-09-30T22:11:55+5:30

Amazon Great Indian Festival Sale मधून 54,999 रुपये किमतीचा OnePlus 10T 5G फोन ऑर्डर केला असता ग्राहकाला 5 रुपयांचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येत असलेले Exo साबण मिळाले आहेत.

amazon customers get soap bar in the box instead of oneplus 10t 5g phone | ऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण

ऑर्डर केला 54,999 रुपयांचा OnePlus चा स्मार्टफोन पण मिळाले 5 रुपयांचे भांडी घासायचे साबण

googlenewsNext

सणासुदीच्या काळात ई-कॉमर्स कंपन्यांकडून देखील ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी भरपूर ऑफर्सही दिल्या जातात. ऑफर्स असल्याने ग्राहक देखील ऑनलाईन वस्तू खरेदी करण्यास प्राधान्य देतात. मात्र अनेकदा ऑनलाईन वस्तू मागवल्यानंतर फसवणूक झाल्याच्या घटना या समोर आल्या आहेत. अशीच एक घटना आता मुंबईमध्ये घडली आहे. Amazon Great Indian Festival Sale मधून 54,999 रुपये किमतीचा OnePlus 10T 5G फोन ऑर्डर केला असता ग्राहकाला 5 रुपयांचे भांडी धुण्यासाठी वापरण्यात येत असलेले Exo साबण मिळाले आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत राहणाऱ्या अशोक भंबानी यांच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडला आहे. अशोक यांनी Amazon इंडियाच्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलच्या पहिल्याच दिवशी शॉपिंग साइटवर नवीन OnePlus 10T 5G मोबाइल फोन ऑर्डर केला होता, ज्याची किंमत 54,999 रुपये आहे. अशोकने ऑर्डर केलेला OnePlus घरी डिलिव्हरी करण्यात आला. ऑर्डर दिल्यानंतर अशोकने तो न उघडता आपल्याजवळ ठेवला आणि बॉक्स उघडण्यासाठी नवरात्रीची वाट पाहिली.

नवरात्रीचा पहिला दिवस येताच, अशोक भंबानी यांनी उत्साहाने आपला नवीन स्मार्टफोन उघडण्याची तयारी केली. पण, फोनचा बॉक्स उघडताच त्यांना खूप मोठा धक्का बसला. OnePlus 10T 5G फोनच्या बॉक्समध्ये मोबाईल नव्हता. तर स्मार्टफोनऐवजी त्यात डिशवॉशिंग साबण होते. पाच रुपयांचे डिशवॉशिंग साबण दिसताच आपली फसवणूक झाल्याचे अशोकला समजले. या फसवणुकीची माहिती देताना अशोक यांनी Amazon ग्राहक सेवेवर तक्रार दाखल केली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

ऑर्डर केला ड्रोन कॅमेरा पण घरी आले 1 किलो बटाटे

बिहारमधून पण अशीच एक घटना समोर आली आहे. नालंदाच्या परवलपूरमध्ये मीशोवरून मागवलेल्या ड्रोन कॅमेऱ्याच्या बदल्यात एका व्यक्तीला चक्क एक किलो बटाटे मिळाल्याची घटना घडली आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये ग्राहक मीशो डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हला पार्सल उघडण्यास सांगतो. डिलिव्हरी बॉयने पार्सल उघडले असता ड्रोन कॅमेऱ्याऐवजी त्यात 10 बटाटे सापडले. यानंतर डिलिव्हरी एक्झिक्युटिव्हने यात आपली कोणतीही भूमिका नसल्याचा दावा केला आहे. चैतन्य कुमार या व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, त्याने डीजेआय ड्रोन कॅमेरा मीशोवरून सवलतीच्या दरात घेतला होता. त्याने ऑर्डर केलेल्या ड्रोन कॅमेऱ्याची बाजारातील किंमत 84,999 रुपये होती पण तो Meesho वर 10,212 रुपयांना उपलब्ध होता.

 

Web Title: amazon customers get soap bar in the box instead of oneplus 10t 5g phone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.