अॅमेझॉनने पुन्हा केला भारताचा अपमान
By admin | Published: January 14, 2017 10:56 PM2017-01-14T22:56:50+5:302017-01-14T22:56:50+5:30
मेझॉनने पुन्हा एकदा समस्त भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे. ऑनलाइन शॉपिंगमधील सर्वात मोठे संकेतस्थळ असलेल्या अॅमेझॉनने
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 14 - भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाची पायपुसणी कॅनडातील संकेतस्थळावर विक्रीसाठी ठेवण्यावरुन झालेला वाद अद्याप निवळलेला नसताना अॅमेझॉनने पुन्हा एकदा समस्त भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे. ऑनलाइन शॉपिंगमधील सर्वात मोठे संकेतस्थळ असलेल्या अॅमेझॉनने आता राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान केला आहे.
अॅमेझॉनने गांधी फ्लीप, फ्लॉप्स नावाचे स्लीपर्स विक्रीसाठी संकेस्थळावर ठेवले असून या स्लीपर्सवर राष्ट्रपिता महात्मा गांधींचे छायाचित्र आहे. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसणीवरुन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अॅमेझॉनला कठोर शब्दात इशारा दिल्यानंतर अॅमेझॉनने माफी मागितली होती. पण आपल्या चुकीमधून कोणताही धडा न घेता अॅमेझॉनने पुन्हा एकदा समस्त भारतीयांना चीड येईल अशी कृती केली आहे.