आपलेही झाले परके! 20 वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते भाऊ-बहीण; अवस्था पाहून सर्वच हादरले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2023 12:07 PM2023-03-19T12:07:57+5:302023-03-19T12:08:59+5:30
दोन भावंडांचा समावेश असून यामध्ये महिलेने एम.ए. बीएड केले आहे.
पंजाबमधील लुधियाना येथील 'मनुख्ता दी सेवा सबसे बडी सेवा' या संस्थेने अनेक वर्षांपासून घरातील एका खोलीत कैद असलेल्या अंबाला कॅन्टोन्मेंट आणि शहरातील अशा तीन जणांची सुटका केली आहे. हे तिन्ही लोक मानसिकदृष्ट्या कमकुवत आहेत. यामध्ये बोह गावातील रहिवासी दोन भावंडांचा समावेश असून यामध्ये महिलेने एम.ए. बीएड केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोह गावातील भाऊ-बहीण गेल्या 20 वर्षांपासून एकाच खोलीत बंद होते. त्याचे वडील डॉक्टर असल्याचे सांगितले जात आहे. तर अंबाला शहरातील जोगीवाडा येथून एका व्यक्तीची सुटका करण्यात आली आहे. संघटनेचे लोक या तिघांना लुधियानाला घेऊन गेले आहेत. संस्थेशी संबंधित मिंटू मालवा यांनी सांगितले की, संस्था अशा लोकांना मदत करते, जे मंद आहेत, ज्यांना कोणीही मदत करत नाही.
मिंटू यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ अंबाला यांच्याकडे आला होता. यानंतर वंदे मातरम दलाने मिळून या लोकांची सुटका केली आहे. या लोकांना चांगले जीवन देण्यासाठी प्रयत्न केल्याचं सांगितलं. तिघेही अत्यंत अस्वच्छतेत जगत होते. या सर्वांची मानसिक स्थिती कमकुवत आहे. सुटका करण्यात आलेली महिला सुशिक्षित असली तरी तिची मानसिक स्थिती चांगली नाही. या लोकांच्या नातेवाईकांनीही त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली नाही. मूलभूत सुविधांपासून ते वंचित होते. एका हिंदी वेबसाईटने य़ाबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"