भयंकर! 4 वर्षांच्या मुलीवर पिटबुलचा जीवघेणा हल्ला; शरीरावर 15 वेळा चावल्याच्या खुणा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2023 11:13 AM2023-04-04T11:13:15+5:302023-04-04T11:14:01+5:30
मुलगी संध्याकाळी एकटी रस्त्यावरून जात असताना शेजारची मुलगी पिटबुल घेऊन फिरत होती. याच दरम्यान पिटबुलने अचानक लहान मुलीवर हल्ला केला आणि त्यानंतर आजूबाजूचे इतर कुत्रेही तिच्या जवळ आले.
हरियाणातील अंबाला जिल्ह्यात कुत्र्यांची दहशत वाढत आहे. बहुतेक पाळीव कुत्रे मुलांवर हल्ले करणारे असतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. अंबाला कॅन्टोन्मेंटमध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर पिटबुलने जीवघेणा हल्ला केला आहे. पिटबुल मुलीच्या शरीराला 15 वेळा चावल्याच्या खुणा आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही ही संपूर्ण घटना कैद झाली आहे.
मुलगी संध्याकाळी एकटी रस्त्यावरून जात असताना शेजारची मुलगी पिटबुल घेऊन फिरत होती. याच दरम्यान पिटबुलने अचानक लहान मुलीवर हल्ला केला आणि त्यानंतर आजूबाजूचे इतर कुत्रेही तिच्या जवळ आले. मुलीच्या मागून चालत असलेल्या व्यक्तीने कसातरी मुलीचा जीव वाचवला. तसेच काही लोकांनी मदतही केली. संताप व्यक्त करताना मुलीच्या वडिलांनी सांगितले की, लोकांनी घरात धोकादायक जातीचे कुत्रे पाळले आहेत.
वडिलांनी सांगितले की, शेजारी राहणाऱ्या अंजू आणि तिच्या आई-वडिलांच्या नावाने तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी घरात अनेक कुत्रे पाळले आहेत, ज्याचा ते व्यवसाय करतात. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, मला कायदेशीर कारवाई हवी आहे. पोलीस कुत्र्याच्या मालकिणीवरही कारवाई करत आहेत. एसएचओ रामपाल सिंह यांनी सांगितले की, अंबाला येथील निशांत बाग येथील रहिवासी असलेल्या अमितने आपल्या मुलीला कुत्र्याने चावा घेतल्याची तक्रार दिली आहे.
घरापासून अवघ्या काही अंतरावर राहणाऱ्या एका महिलेने कुत्रा पाळला आहे. त्यांनी सांगितले की, कुत्र्याने मुलीला अनेक ठिकाणी चावा घेतला असून खूप टाकेही पडले आहेत, त्यामुळे पोलिसांनी कुत्र्याच्या मालकिणीवर गुन्हा दाखल केला आहे. सध्या कुत्र्याची मालकीण फरार आहे. पोलीस शोध घेत आहेत. त्याचबरोबर लोकांसाठी धोकादायक अशी कुत्री कोणीही आपल्या परिसरात पाळू नयेत, एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"