अंबानी, अदानींना माहीत होता निर्णय
By admin | Published: November 18, 2016 01:23 AM2016-11-18T01:23:05+5:302016-11-18T01:23:05+5:30
अदानी आणि अंबांनी यांच्यासारख्या उद्योगपतींना ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचा निर्णय आधीच माहीत होता
जयपूर : अदानी आणि अंबांनी यांच्यासारख्या उद्योगपतींना ५00 व १ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद होणार असल्याचा निर्णय आधीच माहीत होता, असा धक्कादायक गौप्यस्फोट भाजपाच्याच आमदाराने केला आहे. राजस्थानमधील कोटा जिल्ह्यातील भाजपाचे आमदार भवानी सिंह राजावत यांनी हा गौप्यस्फोट केला आहे.
भवानी सिंह राजावत यांचा एक कथित व्हिडीओ बुधवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. अदानी, अंबानी यासारख्या उद्योगपतींना नोटाबंदीचा निर्णय आधीपासूनच माहिती होता. याबाबत त्यांना अप्रत्यक्ष सूचना दिली गेली होती. त्यामुळे निर्णयाची घोषणा होण्याआधीच त्यांनी योग्य व्यवस्था केली आणि दोन हजार रुपयांच्या नोटांचा दर्जा अतिशय वाईट असून, त्या बनावटच वाटतात, असेही ते या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.
हा व्हिडीओ समोर येताच राजपूत यांनी सारवासारवही केली आहे. मी काही पत्रकारांशी गप्पा मारत होतो, तसेच या व्हिडीओमध्ये छेडछाड करण्यात आली आहे. व्हिडीओमध्ये जसे दिसत आहे, तसे मी काही बोललो नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी दिले. मात्र, या व्हिडीओमुळे विरोधकांच्या हाती घबाडच मिळाले आहे. (वृत्तसंस्था)