अंबानी, अदानींच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2020 04:50 AM2020-05-31T04:50:03+5:302020-05-31T04:50:16+5:30

सर्वाधिक वाढ रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या बाजारमूल्यात झाली आहे.

Ambani, Adani's highest increase in market value | अंबानी, अदानींच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ

अंबानी, अदानींच्या बाजारमूल्यात सर्वाधिक वाढ

Next

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोविड-१९ लॉकडाऊनच्या काळात मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स हा २३ टक्क्यांनी वाढला आहे; परंतु काही ब्ल्यूचिप कंपन्यांच्या समभागांचे भाव २६ ते ७८ टक्के वाढले आहेत. याचा परिणाम म्हणून काही उद्योगपतींचे बाजारमूल्यसुद्धा वाढले आहेत.


सर्वाधिक वाढ रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या बाजारमूल्यात झाली आहे. हे बाजारमूल्य ५.६७ लाख कोटींवरून ७८ टक्क्यांनी वाढून १०.०७ लाख कोटी झाले आहे. यापाठोपाठ गौतम अदानींच्या अदानी समूहाचे बाजारमूल्य १.१७ लाख कोटींवरून १.६८ लाख कोटी झाले आहे. ही वाढ ४४ टक्के आहे.
1.13 लाख कोटींवरून शिव नाडर यांच्या एचसीएल कॉम्प्युटर्सचे बाजारमूल्य ३० टक्क्यांनी वाढून १.४८ लाख कोटी झाले, तर कुमारमंगलम बिर्ला यांच्या ए.व्ही. बिर्ला समूहाचे बाजारमूल्य १.६९ लाख कोटींवरून २.१६ लाख कोटी झाले. ही वाढ २८ टक्के आहे. डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांच्या कंपनीचे बाजारमूल्य १.१८ लाख कोटींवरून २६ टक्क्यांनी वाढून १.५० लाख कोटी झाले. अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्टस् ही दमानी यांची कंपनी आहे.
30 कंपन्यांचे समभाग मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात आहेत. या सर्व कंपन्यांचे मिळून बाजारमूल्य १०१.८० लाख कोटींवरून २३ टक्क्यांनी वाढून १२५.५० लाख कोटी झाले आहे.
80 हजार कोटींवरून दिलीप संघवी यांच्या सन फार्माचे बाजारमूल्य ४२ टक्क्यांनी वाढून १.१४ लाख कोटी झाले. सुनील भारती मित्तल यांच्या एअरटेलचे मूल्य २.४८ लाख कोटींवरून ४१ टक्क्यांनी वाढून ३.४८ लाख कोटी रुपये झाले, तर अनिल अगरवाल यांच्या वेदांत रिसोर्सेसचे मूल्य ७९ कोटींवरून ३८ टक्क्यांनी वाढून १.०९ लाख कोटी झाले आहे.

Web Title: Ambani, Adani's highest increase in market value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.