बेळगाव कुर्‍हे येथे आंबेडकर जयंती साजरी

By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:14+5:302016-04-15T23:34:53+5:30

बेलगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे ,लिलाबाई सोनवणे, शोभा आहेर, श्रीधर सोनवणे, बाळासाहेब नाठे, संतोष आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, लिपिक सुनील नाठे, माजी सदस्य काळू सोनवणे, दत्तू नाठे, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे व श्रीधर सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामोदयातून भारत उदय अभियान 14 ते 24 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गा

Ambedkar Jayanti celebrated at Belgaum Kurhe | बेळगाव कुर्‍हे येथे आंबेडकर जयंती साजरी

बेळगाव कुर्‍हे येथे आंबेडकर जयंती साजरी

Next

बेलगाव कुर्‍हे : इगतपुरी तालुक्यातील गोंदे दुमाला येथील ग्रामपंचायत कार्यालयात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमीत्त त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे ,लिलाबाई सोनवणे, शोभा आहेर, श्रीधर सोनवणे, बाळासाहेब नाठे, संतोष आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने, लिपिक सुनील नाठे, माजी सदस्य काळू सोनवणे, दत्तू नाठे, आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे व श्रीधर सोनवणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे पूजन केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त गोंदे दुमाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामोदयातून भारत उदय अभियान 14 ते 24 एप्रिल या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यामध्ये सामाजिक समरसता, पंचायतीचे मजबुतीकरण, गावाचा व शेतकर्‍यांचा विकास व त्यांच्यासाठी निगिडत अभियान राबवून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार घरा- घरात पोहचिवण्यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी निर्धार केला. सामाजिक सलोखा राखून सर्व योजनांची माहिती देखील देण्यात येणार आहे. गोंदे दुमाला येथील सिद्दीविनायक माध्यमिक विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी लागणारा खर्च तसेच गरजू विद्यार्थ्यांना शाळेतून एक विध्यार्थी दत्तक घेण्याचे ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने यांनी यावेळी सूचित केले.
--------------------------------
फोटो ओळी- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालताना ग्रामपंचायत सदस्य लिलाबाई सोनवणे, श्रीधर सोनवणे, उपसरपंच कमलाकर नाठे, ग्रामपंचायत सदस्य अशोक नाठे, शोभा आहेर, ग्रामविकास अधिकारी सुरेश भोजने आदी. (१४बेळगाव कुर्‍हे)

Web Title: Ambedkar Jayanti celebrated at Belgaum Kurhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.