राजारामनगर शाळेत आंबेडकर जयंती साजरी
By admin | Published: April 15, 2016 01:55 AM2016-04-15T01:55:21+5:302016-04-15T22:54:13+5:30
दिंडोरी- कादवा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरील प्राथमिक विद्यामंदिर राजारामनगर शाळेत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिन उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यालयाचे मुख्याध्यापक अशोक शिंदे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन केले व त्यांच्या जीवनकार्याचा परिचय करु न देत ,त्यांची दलितांविषयी तळमळ,त्यांचे पुरोगामी विचार,शिक्षणविषयक त्यांचा दृष्टीकोन,तळमळ,शिक्षण घेत असतांना घेतलेले परिश्रम ,त्यांच्यातील आत्मविश्वास ,दुरदर्शीपणा इत्यादी विषयी सविस्तर सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनीही मनोगत व्यक्त करत महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. कार्यक्रमास श्रीमती कल्पना गटकळ,सुनिता आहेर,सुरेखा कदम,सरला गोजरे, दिपक भालेराव,सोमनाथ गटकळ उपस्थित होते.