आंबेडकरांचे पुस्तक अभ्यासक्रमातून बाद
By Admin | Published: August 13, 2015 02:15 AM2015-08-13T02:15:15+5:302015-08-13T02:15:15+5:30
गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले ‘राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय राज्य
अहमदाबाद : गुजरातमध्ये इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत अभ्यासाला असलेले ‘राष्ट्रीय महापुरुष भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्याचा आरोप करण्यात आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
डॉ. आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती सोहळ्यानिमित्त हे पुस्तक छापण्यात आले होते. प्रख्यात विचारवंत पी.ए. परमार यांनी गुजराती भाषेत लिहिलेले हे पुस्तक राज्याच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण खात्याने अभ्यासक्रमात लागू करून ते राज्यभरातील सरकारी प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांना वितरितही केले होते. तथापि, या पुस्तकात हिंदू धर्माच्या विरोधात मजकूर असल्यामुळे हे पुस्तक आता अभ्यासक्रमातून वगळण्याचा निर्णय गुजरात सरकारने घेतला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. (वृत्तसंस्था)