Video : खरे हिरो! तब्बल 84 तास रुग्णवाहिकेने 3000 किमी दूर पोहोचवला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 06:57 PM2020-04-29T18:57:23+5:302020-04-29T19:06:07+5:30
देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
नवी दिल्ली - चीनमध्ये सुरू झालेल्या कोरोनाच्या संसर्गाने आता जगभरात हाहाकार माजवला आहे. अमेरिका आणि युरोपीयन देशांमध्ये हा व्हायरस वेगाने पसरत चालला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 31,332 हून अधिक झाली असून आतापर्यंत 1007 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. अनेक जण आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी तत्पर असलेले पाहायला मिळत आहे. अशीच कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
तामिळनाडूमधील दोघांनी 84 तास रुग्णवाहिका चालवून 3000 किमी दूर मृतदेह पोहोचवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या या कामाचं सर्वच जण कौतुक करत आहेत. याचा एक व्हिडीओही सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मिझोरममधील एका तरुणाचा चेन्नईमध्ये हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मिझोरमला पोहोचवण्यात आला. आयजलच्या मॉडेल वेंगमध्ये राहणाऱ्या 28 वर्षांच्या विवियन लालरेमसांगा याचा चेन्नईत मृत्यू झाला. मात्र लॉकडाऊनमुळे त्याचा मृतदेह गावी नेणं कठीण काम होतं. जेयंतिजरन आणि चिन्नाथंबी या दोन चालकांनी हे आव्हानात्मक काम केलं आहे.
Mizo people welcoming and saluting our heroes!@TamilTheHindupic.twitter.com/ctWKE5v8n5
— Zoramthanga (@ZoramthangaCM) April 28, 2020
जवळपास 84 तास रुग्णवाहिकेने तब्बल 3000 किमी अंतर पार करत विवियनचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला. जेयंतिजरन आणि चिन्नाथंबी या दोघांनी रुग्णवाहिका चालवली. त्याचं सर्व कौतुक होत आहे. मिझोरमचे मुख्यमंत्री जोरमथांगा यांनी देखील एक व्हिडिओ ट्विट करून त्या दोघांचं कौतुक केलं आहे. 'मिझोरम रिअल लाईफ हिरोंचे अशा प्रकारे स्वागत करतं. कारण आमचा माणुसकी आणि राष्ट्रवादावर विश्वास आहे. तुमचे आभार' असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्ताला रिपोर्ट येण्याआधीच दिला डिस्चार्ज अन्...https://t.co/hBSNjrEEBb#coronavirusinindia
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2020
Coronavirus : आदिवासी महिलांची कमाल, Youtube वर व्हिडीओ पाहून 'या' फुलांपासून बनवलं सॅनिटायझरhttps://t.co/nVNrqQLVun#coronaupdatesindia#sanitizer
— Lokmat (@MiLOKMAT) April 29, 2020
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : रुग्णालयाचा निष्काळजीपणा! कोरोनाग्रस्ताला रिपोर्ट येण्याआधीच दिला डिस्चार्ज अन्...
Coronavirus : लय भारी! Youtube च्या मदतीने 'या' फुलांपासून तयार केलं स्वस्त आणि मस्त सॅनिटायझर
Coronavirus : बापरे! मास्क लावला नाही तर तब्बल 8 लाखांचा दंड, 'या' देशाने घेतला निर्णय