Video - संतापजनक! फक्त 1000 रुपयांसाठी रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडलं
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2022 08:17 AM2022-09-07T08:17:21+5:302022-09-07T08:23:05+5:30
Video - फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे.
उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. एका रुग्णवाहिकेच्या चालकाने गर्भवतीसोबत धक्कादायक कृत्य केलं आहे. फक्त 1000 रुपयांसाठी या चालकाने गर्भवतीला रस्त्यातच सोडून दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. महिला वेदनेने कळवळत होती पण तरीही कोणतंही वाहन तिच्या मदतीसाठी थांबलं नाहीय या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये पंधरी गावातील ही घटना असल्याचं सांगितलं जातं आहे. एका गर्भवतीला प्रसूती वेदना सुरू झाल्यावर रुग्णालयात नेण्यात येत होते. त्यासाठी रुग्णवाहिका देखील बोलावण्यात आली. पण जेव्हा रुग्णवाहिकेच्या चालकाला महिलेच्या नातेवाईकांमकडे पैसे नसल्याचं कळलं तेव्हा त्याने रस्त्यातच गर्भवती आणि तिच्या काही नातेवाईकांना रुग्णवाहिकेतून खाली उतरवलं. एका हजार रुपयांसाठी ही घटना घडली.
यूपी में एंबुलेस कंपनी और उनके ड्राइवरों की बदमाशी कौन नहीं जानता।
— Rajesh Sahu (@askrajeshsahu) September 6, 2022
ये वीडियो हमीरपुर के पंधरी गांव का है। परिवार के पास देने के लिए 1000 नहीं थे इसलिए गर्भवती महिला को सड़क पर ही छोड़ दिया।
इतने निर्मम लोगों हैं कि क्या ही कहा जाए। pic.twitter.com/So8OKthLsP
राजेश साहू यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यांनी या पोस्टमध्ये या घटनेची माहिती दिली आहे. रुग्णवाहिका चालकाने महिलेच्या कुटुंबाकडे 1000 रुपये मागितले. तरच रुग्णालयात पोहोचवू असं सांगितलं. पण कुटुंबाकडे तितके पैसे नव्हते, त्यामुळे ते चालकाला तितके पैसे देऊ शकले नाही. म्हणून त्याने महिलेला रस्त्यात सोडलं आणि तो तिथून निघून गेला.
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओत रस्त्याच्या कडेला एक गर्भवती बसलेली असल्याचं दिसतं आहे. तिला प्रसूती वेदना होत आहेत. तिचे नातेवाईक तिला आधार देताना दिसत आहेत. तर पुढे एक रुग्णवाहिका तिथून जाताना दिसते आहे. हा व्हिडीओ पाहून सर्वांना धक्का बसला आहे. रुग्णवाहिकेच्या चालकावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली जात आहे.एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.