CoronaVirus News: तुमची आई गेली! रुग्णवाहिका चालकाला रात्री आला कॉल; त्यानंतर त्यानं जे केलं ते वाचून कौतुक कराल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 11:04 IST2021-05-25T11:03:47+5:302021-05-25T11:04:12+5:30
CoronaVirus News: रात्री कर्तव्यावर असताना रुग्णवाहिका चालकाला आईचं निधन झाल्याचा कॉल

CoronaVirus News: तुमची आई गेली! रुग्णवाहिका चालकाला रात्री आला कॉल; त्यानंतर त्यानं जे केलं ते वाचून कौतुक कराल
मैनपुरी: देशातील कोरोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून कमी होत आहे. एप्रिलपासून देशात कोरोनाची दुसरी लाट आली. कोरोनानं अक्षरश: हाहाकार माजवला. मे महिन्याच्या सुरुवातीला देशात दररोज ४ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येत होते. या कालावधीत डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका चालक या सगळ्यांनी अडचणींचा सामना केला. कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली असली, तरी ही मंडळी अथकपणे काम करत आहेत.
लसींबद्दलचा 'तो' एक निर्णय देशाला भोवणार? मोदी सरकारच्या 'यू-टर्न'नंतरही भारत 'वेटिंग लिस्ट'मध्येच
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमधील एका रुग्णवाहिका चालकाच्या कर्तव्यनिष्ठेचं सध्या सर्वत्र कौतुक होत आहे. १५ मेच्या रात्री प्रभात यादव यांना एक कॉल आला. आई गेल्याची दु:खद वार्ता त्यांना फोनवरून समजली. प्रभात यांच्यावर आभाळ कोसळलं होतं. मात्र ते कर्तव्यापासून जराही विचलित झाले नाहीत. रात्रभर त्यांना कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांचे फोन येत होते. या रुग्णांना वेळेवर उपचार मिळणं गरजेचं होते. त्यामुळे घरी न जाता प्रभात त्यांचं कर्तव्य बजावत राहिले. संपूर्ण रात्र प्रभात रुग्णवाहिका चालवत होती. सकाळपर्यंत त्यांनी १५ रुग्णांना रुग्णालयात पोहोचवलं. सकाळी ड्युटी संपल्यावर ते घरी पोहोचले.
शुभसंकेत! कोरोना संकटात देशाला डबल दिलासा; ४० दिवसांनंतर प्रथमच 'असं' घडलं
उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये राहणाऱ्या प्रभात यांच्या कामाचं ठिकाण घरापासून २०० किलोमीटरवर आहे. आईच्या निधनाची माहिती मिळाल्यानंतरही त्यांनी कर्तव्यात कसूर केली नाही. सकाळी ड्युटी संपल्यानंतर ते घरी गेले. आईच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केल्यानंतर ते पुन्हा कामावर रुजू झाले. 'आई गेल्याचं ऐकून मला धक्का बसला. पण मी स्वत:ला सावरलं. मी कोरोना रुग्णाला घेऊन रुग्णालयात पोहोचलो. त्यानंतर आणखी काही रुग्णदेखील माझी वाट पाहात होते. त्यांना प्राधान्य देणं मला गरजेचं वाटलं. त्यामुळे मी रात्रभर काम केलं आणि सकाळी घरी पोहोचलो,' असं प्रभात यांनी सांगितलं.