हृदयद्रावक! रुग्णवाहिका न मिळाल्यानं आईनेच हातगाडीला धक्के मारत मुलाला रुग्णालयात पोहोचवलं
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 04:42 PM2020-08-06T16:42:00+5:302020-08-06T16:49:26+5:30
छत्तीसगडमधील वाड्रफनगर सरगुजा परिसरात अशीच एक दयनीय घटना घडली आहे.
कोरोनाकाळात लॉकडाऊनमुळे कधीही उद्भवलेल्या गंभीर स्थितीचा सामना अनेकांना करावा लागला आहे. कोरोना संक्रमणाचा वेग झपाट्यानं वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणाही अनेक ठिकाणी सेवा पुरवू शकत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. छत्तीसगडमधील वाड्रफनगर सरगुजा परिसरात अशीच एक दयनीय घटना घडली आहे.
बलरामपूर जिल्ह्यातील वाड्रफनगर येथे एक कामगार रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत दिसून आला. उपस्थित लोकांनी रुग्णवाहिकेस फोन केल्यास रुग्णवाहिका उपलब्ध नसून इतर ठिकाणी पाठवल्याचे कळाले. त्यानंतर नाईलाजाने या कामगाराच्या आई वडिलांनी एका हातगाडीवर ठेवून आपल्या मुलाला रुग्णालयापर्यंत पोहोचवले. यावेळी पिडीत व्यक्तीच्या वृद्ध आईने या हातगाडीला धक्का मारत रुग्णालयापर्यंत पोहोचवले.
वाड्रफनगर येथिल रहिवासी असलेले अशोक पासवान हातगाडी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. बुधवारी राजीव गांधी चौकात अचानक चक्कर येऊन पडल्यानं त्यांना गंभीर जखम झाली हे पाहून आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी रुग्णवाहिकेला १०८ या क्रमांकावर फोन केल्यास कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराचवेळ रस्त्याच्याकडेला पडलेल्या व्यक्तीला पाहून कोणत्याही खासगी वाहनानं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्याची हिंमत केली नाही.
जेव्हा या व्यक्तीच्या आई वडिलांपर्यंत ही बाब पोहोचली. त्यानंतर त्यांनी आपल्या शेजारच्यांकडून हातगाडी मागत त्या हातगाडीवर मुलाला ठेवून रुग्णालयात घेऊन गेले. आईने संपूर्ण रस्ता हातगाडीला धक्का मारत कसंबसं रुग्णालयापर्यंतचे अंतर पार केले. रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार डोक्याला गंभीर जखमी झाल्यामुळे अंबिकापूर मेडिकल कॉलेजमध्ये भरती करण्याचे सांगितले आहे. या घटनेनं आसपासच्या परिसरात खळबळ पसरली आहे. आरोग्यव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
बाबो! ऑफिस मीटिंगमध्ये व्यक्तीच्या फोनवर आला मेसेज, उघडताच ३० सेकंदात संपलं पूर्ण करिअर