घातपात कट उधळला, १६० गावठी बाॅम्ब जप्त, बिहारच्या छकरबंधा, गरिबा आणि डोभामध्ये छापेमारी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2023 07:27 AM2023-01-29T07:27:43+5:302023-01-29T07:28:19+5:30
Bihar News: बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सीआरपीएफ कोबरा व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. गया-औरंगाबाद सीमावर्ती भागात छकरबंधा, लडुईया, गरिबा डोभासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारच्या औरंगाबाद जिल्ह्यात सीआरपीएफ कोबरा व जिल्हा पोलिसांच्या संयुक्त कारवाईत १६० गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. गया-औरंगाबाद सीमावर्ती भागात छकरबंधा, लडुईया, गरिबा डोभासह अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यातून मोठ्या घातपाताचा कट उधळण्यात आला.
शोध सत्रात १३ प्रेशर आयईडी जप्त करण्यात आले. एका गुहेतून १४९ आयईडी जप्त करण्यात आले. हे सर्व आयईडी नष्ट करण्यात आले. नक्षली मोठी हल्ला करण्याच्या तयारीत असताना ही कारवाई करण्यात आली आहे.
नक्षलींचे पलायन
औरंगाबादच्या देवमध्ये पर्यटन विभाग व जिल्हा प्रशासनातर्फे तीन दिवसीय सूर्य महोत्सव शनिवारपासून सुरू झाला. हा महोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जंगलात छापेमारी सुरू करण्यात आली होती. त्यात सुरक्षा दलांना मोठे यश प्राप्त झाले. यामुळे नक्षलींना पलायन केले.
स्फोटके केली जप्त
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येलाही नक्षलींनी सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचा कट रचला होता.
त्यासाठीचा दारूगोळा व इतर स्फोटके वेळीच जप्त करण्यात आले.
त्यावेळी दोन आयईडी जप्त करून जंगलात नष्ट करण्यात आले होते.