नगसेवकांचे मानधन १५ हजार करा महासभेत ठराव: महिनाभरात ६ महिन्यांची बाकी देणार

By admin | Published: February 21, 2016 12:31 AM2016-02-21T00:31:13+5:302016-02-21T00:31:13+5:30

जळगाव : नगरसेवकांना जुन्या कालखंडातील मानधनही अद्याप मिळाले नाही. मुंबईत महापालिका नगरसेवकांना ८० हजार मानधन देते. जळगावात किमान १५ हजार द्यावे असा ठराव महापालिका महासभेत सदस्यांनी एकमताने केला.

Amendment of Rs. 15 thousand to the Mahasabha: Give 6 months to the end of the month | नगसेवकांचे मानधन १५ हजार करा महासभेत ठराव: महिनाभरात ६ महिन्यांची बाकी देणार

नगसेवकांचे मानधन १५ हजार करा महासभेत ठराव: महिनाभरात ६ महिन्यांची बाकी देणार

Next
गाव : नगरसेवकांना जुन्या कालखंडातील मानधनही अद्याप मिळाले नाही. मुंबईत महापालिका नगरसेवकांना ८० हजार मानधन देते. जळगावात किमान १५ हजार द्यावे असा ठराव महापालिका महासभेत सदस्यांनी एकमताने केला.
महापालिकेची महासभा महापौर राखी सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजिण्यात आली होती. उपमहापौर सुनील महाजन, उपायुक्त प्रदीप जगताप, नगरसचिव निरंजन सैंदाणे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
सभेतील चर्चेत नगरसेवक अजय पाटील यांनी नगरसेवकांच्या मानधनाचा विषय उपस्थित केला. अडीच वर्षात एकदाही मानधन मिळाले नाही याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांचा मुद्दा उचलून धरत कैलास सोनवणे यांनीही याप्रश्नी चर्चेत भाग घेतला. काही नगरसेवक गरीब आहेत. त्यांना मानधन आवश्यक असल्याचे सांगून मुबई महापालिका नगरसेवकांना ८० हजार मानधन देते. जळगावात केवळ ७५०० मिळतात. तेदेखील ३० महिन्यांपासून मिळाले नाहीत. ठेकेदारांचे पेमेंट वेळेवर काढले जाते मग आमचे मानधन का नाही? दिवंगत पत्रकार हेमंत पाटील यांना सदस्यांनी एका महिन्याचे मानधन देण्याचे जाहीर केले. त्यातही दिरंगाई केली जात आहे. याप्रश्नी खुलासा करावा असे ते म्हणाले. खासदार, आमदारांचे मानधन वाढले मग आमचे का नाही? असे सांगून सदस्यांना १५ हजार मानधन मिळावे असा ठराव त्यांनी मांडला. येत्या १ एप्रिलपासून नवीन मानधनाच्या मागणीची अंमलबजावणी केली जावी असे त्यांनी यावेळी सूचविले. याप्रश्नी सदस्यांच्या भावना संतप्त असल्याने उपायुक्तांनी स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी नितीन ल‹ा यांनी केली. यावेळी सदस्यांना १५ हजाराचे मानधन मिळावे असा ठराव एकमताने करण्यात आला.

महिनाभरात मानधन
सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन उपायुक्त प्रदीप जगताप यांनी येत्या महिनाभरात सदस्यांना सहा महिन्याचे मानधन दिले जाईल, असे स्पष्टीकरण दिले.
-----

Web Title: Amendment of Rs. 15 thousand to the Mahasabha: Give 6 months to the end of the month

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.