भारत आणि रशियाचे संबंध बिघडवू पाहतोय अमेरिका; G-20 पूर्वी राजदूताचे गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2023 11:04 AM2023-08-31T11:04:06+5:302023-08-31T11:04:22+5:30
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून चांद्रयान-३ च्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.
दिल्लीत होणाऱ्या G-20 देशांच्या शिखर बैठकीपूर्वी भारत आणि रशिया यांच्यातील संबंध ताणू लागले आहेत. भारत आणि रशियाचे संबंध खराब करायचे आहेत असे अमेरिका उघडपणे म्हणत आहे. ही अशी गोष्ट आहे जी आपण स्वीकारू शकत नाही, असा दावा रशियाचे भारतातील राजदूत डेनिस अलीपोव्ह यांनी केला आहे.
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन करून चांद्रयान-३ च्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. भारतासोबत अंतराळ कार्यक्रम करण्याची रशियाची योजना आहे, असे डेनिस म्हणाले. एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेचा हा प्रयत्न आम्ही पुढे सरकू देणार नाही असे म्हटले आहे.
भारतासोबतचे आमचे संबंध चांगुलपणा आणि सकारात्मकतेसाठी आहेत. रशिया जी-20 मध्ये भारताच्या प्राधान्यक्रमांना पूर्ण पाठिंबा देतो. आफ्रिकन देशाचा G-20 मध्ये समावेश करण्याच्या निर्णयाला रशिया पूर्ण पाठिंबा देईल, असेही डेनिस म्हणाले.
युक्रेनचा मुद्दा G-20 मध्ये समाविष्ट करण्यावरून निर्माण झालेल्या वादामुळे संयुक्त निवेदन जारी करण्यात अडथळे येत आहेत. एका बाजूला G7 देश आहेत तर दुसऱ्या बाजूला रशिया आणि चीन एकत्र आले आहेत. सध्या चर्चा ठप्प झाल्याचे दिसते, असे डेनिस म्हणाले. रशिया आणि भारत दोघेही रशियामध्ये भारताची UPI प्रणाली सुरू करण्याच्या शक्यतेवर चर्चा करत आहेत. जर RuPay आमच्या सिस्टीममध्ये वापरला जाऊ लागला तर ते स्वागतार्ह पाऊल असेल, असेही डेनिस म्हणाले.