मोठा दिलासा! लाखो भारतीयांना होणार फायदा; अखेर अमेरिकेनं मोठा निर्णय घेतला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2021 10:48 PM2021-09-20T22:48:04+5:302021-09-20T22:50:23+5:30
ज्यो बायडन प्रशासनाच्या निर्णयामुळे भारतीयांना मोठा दिलासा
वॉशिंग्टन: कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आंतरराष्ट्रीय प्रवासावर असलेली बंदी हटवण्याचा निर्णय अखेर अमेरिकेनं घेतला आहे. नोव्हेंबरपासून निर्बंध हटवण्यास सुरुवात होईल. नव्या नियमांनुसार लस घेतलेल्या लोकांना अमेरिकेत प्रवेश मिळेल. अमेरिकेच्या वाटेकडे डोळे लावून बसलेल्या लाखो लोकांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
चीनमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर अमेरिकेनं हवाई वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला. २०२० च्या सुरुवातीला हा निर्णय घेण्यात आला. मात्र आता हा निर्णय मागे घेण्यात आला आहे. व्हाईट हाऊसनं याबद्दलची माहिती दिली. नव्या नियमांनुसार लसीकरण पूर्ण झालेल्यांना अमेरिकेत प्रवेश असेल. त्यासाठी प्रवाशांना त्यांचं लसीकरण पूर्ण झाल्याचा पुरावा द्यावा लागेल.
जगातील पहिलंच प्रकरण, ब्लॅक फंगसमुळे काढावी लागली एक किडनी आणि फुफ्फुस
अमेरिकेसाठी उड्डाण करण्याच्या ३ दिवस आधी प्रवाशांना कोरोना चाचणी करावी लागेल. या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह असायला हवा. त्यामुळे अमेरिकेत गेल्यावर प्रवाशांना क्वारंटिनमध्ये राहावं लागणार नाही. मात्र मास्क अनिवार्य असेल. याआधी एप्रिलमध्ये राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता. त्यामुळे भारतात अडकलेल्या अमेरिकन नागरिकांनाच अमेरिकेत प्रवेश दिला जाऊ लागला. तर बिगर अमेरिकन लोकांसाठी निर्बंध कायम होते.