अमेरिका आता भारताचा सर्वोच्च व्यापारी भागीदार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2020 01:17 AM2020-02-25T01:17:37+5:302020-02-25T01:17:57+5:30
चीनला टाकले मागे
नवी दिल्ली : चीनला मागे टाकून अमेरिका हा भारताचा सर्वांत मोठा व्यापारी भागीदार देश बनला आहे. एप्रिल ते डिसेंबर २0१९ या काळात चीनचा भारतासोबतचा व्यापार घसरून ६५ अब्ज डॉलरवर आला आहे. या काळात इलेक्ट्रॉनिक व इलेक्ट्रिक वस्तूंची आयात घसरल्यामुळे चीनला फटका बसला आहे. भारताची अमेरिकेला होणारी निर्यात, तसेच अमेरिकेतून होणारी आयात लक्षणीयरीत्या वाढली
आहे. या काळातील दोन्ही देशांचा व्यापार ६८ अब्ज डॉलरचा राहिला.
भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार कसा वाढला?
एप्रिल-डिसेंबर २0१९ या काळात अमेरिकेला होणारी औषधांची निर्यात २५ टक्क्यांनी वाढून 4.8 अब्ज डॉलरवर गेली.
रत्ने-आभूषणांची आयात ११ टक्क्यांनी घसरून 7.1 अब्ज डॉलरवर गेली.
भारताचा चीनसोबतचा व्यापार कसा घटला?
इलेक्ट्रिकल यंत्रे, टीव्हीचे सुटे भाग यांची आयात
४ टक्क्यांनी घसरून 15.4 अब्ज डॉलरवर गेली.
जैविक रसायने आयात 5.5 मासे आणि खनिजांची निर्यात दुपटीने वाढली.