स्मार्ट सिटीसाठी अमेरिका भागीदार
By Admin | Published: February 10, 2016 02:20 AM2016-02-10T02:20:58+5:302016-02-10T02:20:58+5:30
भारतातील सर्व प्रस्तावित शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पात भागीदार होण्याची अमेरिकेची इच्छा आहे. भारत सरकारने अलीकडेच पहिल्या टप्प्यात स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या
नवी दिल्ली : भारतातील सर्व प्रस्तावित शंभर स्मार्ट सिटी प्रकल्पात भागीदार होण्याची अमेरिकेची इच्छा आहे. भारत सरकारने अलीकडेच पहिल्या टप्प्यात स्मार्ट शहर म्हणून विकसित करण्यात येणाऱ्या दहा शहरांची यादी जारी केली आहे.
स्मार्ट शहरांसाठी ठोस उपाय उपलब्ध करण्यात अमेरिका मौलिक भागीदार होऊ शकतो, असे अमेरिकेचे वाणिज्य उपमंत्री ब्रूस अॅण्ड्र्यू यांनी सांगितले. ते पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या सोबत अमेरिकेतील १८ कंपन्यांचे एक शिष्टमंडळही आहे. हे शिष्टमंडळ धोरणकर्ते आणि भारतीय कंपन्याच्या प्रतिनिधींना भेटणार आहेत. तसेच भारताच्या दृष्टीने उपयुक्त अशा महत्त्वपूर्ण तंत्रज्ञानाचे सादरीकरणही करणार आहे. टिकाऊ अर्थव्यवस्थेच्या विकासात भारताच्या मदतीच्या दृष्टीने अमेरिका उपयुक्त भागीदार होऊ शकते. भारतातील स्मार्ट शहर प्रकल्पात व्यवसायासाठी अमेरिकी कंपन्यांना खूप वाव आहे, असेही अॅण्ड्र्यू यांनी सांगितले.
अमेरिकेने विशाखापट्टणम् स्मार्ट शहराच्या बृहत् योजनेत मदत केली. तीन शहरांपुरता आमचा प्रयत्न मर्यादित नाही.