लष्करी सामर्थ्यात अमेरिका अव्वल, भारत चौथ्या क्रमांकावर
By admin | Published: May 15, 2017 11:02 AM2017-05-15T11:02:53+5:302017-05-15T11:28:07+5:30
सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 15 - जगभरात प्रत्येक देशाचा शस्त्रास्त्रांच्या भंडारातून स्वतःला शक्तिशाली बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे. तरीही सर्व देशांमध्ये अमेरिका लष्करी सामर्थ्यात सर्वात शक्तिशाली देश असल्याचं समोर आलं आहे. अमेरिका चीन आणि रशियापेक्षा तीनपटीनं स्वतःच्या लष्करावर पैसा खर्च करत असल्याचीही माहिती मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्लोबल रँकिंगमधून ही गोष्ट उघड झाली आहे. या यादीत भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारत एकूण 51 मिलियन डॉलर लष्करावर खर्च करतो.
रिपोर्टनुसार, अमेरिका स्वतःच्या संरक्षणासाठी जवळपास 600 बिलियन डॉलर एवढा खर्च करतो. तर रशिया एका वर्षात जवळपास 54 बिलियन डॉलर खर्च करतो, चीन 161 बिलियन डॉलर खर्च करतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही पदावर विराजमान झाल्यानंतर संरक्षण सामर्थ्यावर अधिक भर देणार असल्याचे सूतोवाच केले होते. अमेरिकेच्या संरक्षण बजेटमध्ये जवळपास 54 बिलियन डॉलरची वाढ झाली आहे. इसिसचा खतरा लक्षात घेता ट्रम्प यांनी संरक्षण बजेट वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. ग्लोबल रँकिंगच्या यादीत जवळपास 106 देशांचा समावेश आहे. ज्यात अनेक घटकांचा विचार करण्यात आला आहे. यात संरक्षण बजेट, लष्करी सामर्थ्य आणि शस्त्रास्त्रांच्या संख्येवर भर देण्यात आले आहे.
अमेरिकेकडे 5884 टँक्स, 19 एअरक्राफ्टयुक्त हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 13,762 एअरक्राफ्ट, 415चं नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या लष्करी जवानांची संख्या 1,400,000च्या घरात आहे. तर रशियाकडे 20,215 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 3794 एअरक्राफ्ट आणि 352 नौदल सामर्थ्य असून, रशियाच्या सैन्याची संख्या 766055 जवळपास आहे. चीनकडे 6457 टँक्स, 1 हेलिकॉप्टर्स कॅरिअर, 2955 एअरक्राफ्ट 714 नौदल सामर्थ्य असून, त्यांच्या पीपल लिबरेशन आर्मीतील जवानांची संख्या 2335000 आसपास आहे. या सर्व देशांच्या पंक्तीत भारतही विराजमान झाला आहे. भारताकडे 4426 टँक्स, 3 हेलिकॉप्टर केरिअर, 2102 एअरक्राफ्ट, 295 नौदलाचं सामर्थ्य आणि 1325000 जवानांची संख्या आहे.