भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवायची होती; म्हणूनच अमेरिकेने दिले F-16

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2019 10:08 AM2019-03-06T10:08:51+5:302019-03-06T10:10:31+5:30

पाकिस्तानमधील अमेरिकेचे तत्कालीन राजदूत अ‍ॅने पॅटरसन यांनी पाकिस्तानला ही विमाने व युद्धसामुग्री का द्यावीत, यावर बाजू मांडताना हे मत मांडले होते.

America wants to increase Pakistan's power against India; That's why the sell F-16 | भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवायची होती; म्हणूनच अमेरिकेने दिले F-16

भारताविरोधात पाकिस्तानची ताकद वाढवायची होती; म्हणूनच अमेरिकेने दिले F-16

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानला F-16 ही अद्ययावत लढाऊ विमाने देण्यामागे केवळ दहशतवादच नाही तर भारताविरोधात पाकची ताकद वाढविण्याचा सुप्त हेतू असल्याचे समोर येत आहे. भविष्यात भारतासोबत लढाई झाल्यास पाकची ताकद वाढावी, असे अमेरिकेने ही विमाने देताना म्हटले होते. 


पाकिस्तानमधील अमेरिकेचे तत्कालीन राजदूत अ‍ॅने पॅटरसन यांनी पाकिस्तानला ही विमाने व युद्धसामुग्री का द्यावीत, यावर बाजू मांडताना हे मत मांडले होते. त्यावेळी पाकिस्तानला देण्यात आलेल्या युद्धसामुग्रीमध्ये 500 AIM-120-C5 हे अ‍ॅडव्हान्स मध्य रेंज असलेले हवेतून हवेत मारा करू शकणारे अमराम हे मिसाईलही देण्यात आले होते. याच मिसाईलचे काही भाग भारतीय सैन्याला सापडले आहेत. हा धक्कादायक खुलासा दैनिक भास्कर या वृत्तपत्राने केला आहे. 


पॅटरसन यांनी अमेरिकी सरकारला 24 एप्रिल, 2008 मध्ये लिहिलेल्या पत्राचा यामध्ये उल्लेख करण्यात आला आहे. F-16 विमाने पाकिस्तानला दिल्यास भविष्यात भारताविरोधात लढण्यासाठी पाकिस्तान अणूबॉम्बचा वापर करण्याची शक्यता कमी असेल. त्यामुळे F-16 लढाऊ विमाने पाकिस्तानला देण्यात यावीत, असे त्यांनी पत्राद्वारे सुचविले होते. भारतीय हवाईदलाने मंगळवारी 27 फेब्रुवारीच्या घटनाक्रमाची विस्तृतमध्ये माहिती दिली आहे. 


पाकिस्तानने भारतीय हद्दीत F-16 विमाने घुसविली होती. यानंतर त्यांनी मिसाईलही डागले होते. याचे पुरावे आपल्याकडे आहेत. यावरून आधी अमेरिकेला भारताने प्रश्न विचारले असून F-16 आणि AMRAAM मिसाईलच्या विक्रीवेळी ते भारताविरोधात वापरण्याची परवानगी देण्यात आली होती का, जर नव्हती तर अटींचे उल्लंघन झाले आहे. पाकिस्तानला ही विमाने विकत असताना माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांच्या सरकारने भारताला आश्वासन दिले होते. यामध्ये F-16 च्या वापरावर आणि तैनातीवर अमेरिका करडी नजर ठेवेल. तसेच या विमानांचा अभ्यास किंवा अभियानावेळी तिसऱ्या देशाचा वापर केला जाणार असल्याचेही म्हटले होते. 


त्यानंतर पाकिस्तानला दुसऱ्यांदा विमाने विकताना अमेरिकेने दुसऱ्या देशांबरोबर युद्धाभ्यास करायचा असल्यास परवानगी घ्यावी लागणार असल्याचे स्पष्ट केले होते. यावेळी भारताने या विक्रीला विरोध केला होता. 

Web Title: America wants to increase Pakistan's power against India; That's why the sell F-16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.