पुन्हा भारताच्या समर्थनात उभा ठाकला अमेरिका, चीनला दिला सज्जड इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2020 03:49 PM2020-06-02T15:49:07+5:302020-06-02T16:00:42+5:30
चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी वापर करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे.
वाशिंग्टन :चीनने सोमवारी भारताला धमकी दिली होती, चीन आणि अमेरिकेच्या वादात भारत ट्रम्प सरकारच्या बाजूने उभा राहिला, तर हे त्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत घातक सिद्ध होऊ शकते. चीनच्या या धमकीवर अमेरिकेनेही उत्तर दिले आहे. अमेरिकेने म्हटले आहे, की आता चीनने जगातील इतर देशांना धमकावने सोडावे. अमेरिकेतील एक वरिष्ठ खासदार आणि परराष्ट्र संबंधांतील पॅनलचे प्रमुख इलियट एल. एन्जल म्हणाले, की आता चीनने शेजारील देशांशांचा मान ठेवला पाहिजे.
"चीनला 'बॅन' करा, उद्योग-धंदे भारतात हलवा"; अमेरिका तयार करत आहे 'मास्टर प्लॅन'
इलियट म्हणाले, अमेरिकन परराष्ट्र मंत्रालयदेखील भारत-चीन सीमेवरील तणावामुळे चिंतीत आहे. ते म्हणाले चीनचा व्यवहार धमक्या देणारा आहे. आम्ही अपेक्षा करतो, की त्यांनी आपली ही सवय सोडून शेजारील देशांशी 'डिप्लोमसी'च्या माध्यमाने मुद्दे सोडवावेत. इलियट म्हणाले, कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. असे असताना भारत-चीन सीमेवरील तणावाची स्थिती संपूर्ण जगासाठी चिंतेचा विषय आहे. चीनने आंतराष्ट्रीय सीमांचे पालन करायला हवे. तसेच काही समस्या आणि वाद असला, तर तो डिप्लोमसीच्या माध्यमानेच सोडवावा.
भारत-चीन सीमावाद : ट्रम्प यांनी लक्ष घालताच चीनचा सूर बदलला, सुरू झाली 'हिंदी-चिनी भाई-भाई'ची भाषा
इलियट हे अमेरिकेतील अत्यंत प्रभावशाली आणि डेमोक्रॅट पक्षाच्या वरिष्ठ खासदारांपैकी एक आहेत. काश्मीर मुद्द्यावर इलियट म्हणाले, यासंदर्भातही अमेरिकेची स्पष्ट भूमिका आहे, की हा भारत आणि पाकिस्तानचा द्विपक्षीय मुद्दा आहे आणि त्यांनी तो चर्चेतूनच सोडवायला हवा. यात अमेरिकेची भूमिका चर्चेसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण करणे, एवढीच असू शकते. तसेच पाकिस्तानने त्यांच्या देशातील दहशतवादी कारवायांवरही ठोस पावले उचलायला हवीत. असे झाले, तरच या देशांत चर्चा होणे शक्य आहे, असेही म्हटले आहे.
कोरोनाने अमेरिकेत घेतले 1 लाखहून अधिक बळी, नेमकी कुठे झाली 'सुपरपावर'ची चूक
इतरांसाठी धोका निर्माण करतोय चीन -
लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यातील तणावासंदर्भात अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पोम्पिओ यांनी चीनी सेन्याच्या हालचालीसंदर्भात म्हत्वाची माहिती दिली आहे. पोम्पिओ म्हणाले, चीन भारताला लागून असलेल्या सीमेवर मोठ्या प्रमाणावर सैन्याची जमवाजमव करत आहे. चीन आपल्या रणनीतीचा स्वतःच्या भल्यासाठी वापर करत आहे आणि इतरांसाठी धोका निर्माण करत आहे.