अमेरिकन तरुणीने केले भारतातील शेतकऱ्याशी लग्न
By Admin | Published: April 8, 2017 05:12 PM2017-04-08T17:12:47+5:302017-04-08T17:12:47+5:30
अमेरिकेतल्या एका उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मुलीने नुकतेच भारतातील एका शेतकऱ्याशी
>ऑनलाइन लोकमत
सूरत, दि. ८ - दिवसेंदिवस शेती आर्थिकदृष्ट्या तोट्याची होत असल्याने अनेक मुली शेती करणाऱ्या मुलांना लग्नासाठी नकार देत असल्याचे तुम्ही वाचले असेलच. पण अमेरिकेतल्या एका उच्चशिक्षित आणि गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या मुलीने नुकतेच भारतातील एका शेतकऱ्याशी विवाह करून पैशापेक्षाही प्रेम मोठे असल्याचे दाखवून दिले आहे.
जेसिका असे या तरुणीचे नाव असून तिने फेसबूकवरून झालेल्या मैत्रिनंतर आकाश पटेल या गुजरातमधील शेतकऱ्याशी विवाह केला. उच्चशिक्षित आणि बँकेत उच्चपदावर काम करत असलेल्या जेसिका हिची गेल्यावर्षी फेसबूकवरून आकाशशी ओळख झाली होती. लवकच त्यांच्यातील मैत्री प्रैमामध्ये बदलली आणि दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला.
दोघांच्याही प्रेमास कुटुंबीयांनी मान्यता दिल्याने विवाहामध्ये अडचणी आल्या नाहीत. दहा दिवसांपूर्वी आकाशशी विवाह करण्यासाठई जेसिका अमेरिकेतून भारतात आली. त्यानंतर दोघांनीही गुरुवारी संध्याकाळी विवाह केला. आता दोघेही हनिमुनसाठी मुंबईतून मनालीकडे रवाना झाले आहेत.
आता जेसिका अमेरिकेत आपल्या आईवडिलांसमोर पुन्हा एकदा विवाहबद्ध होणार आहे. आकाश हा आमराईचा मालक असून, तो सहदपूरमध्ये उसाची शेतीही करतो. दरम्यान, जेसिका ही आपल्या आईलाही सून म्हणून पसंत असून, खऱ्या प्रेमामध्ये भाषेचा अडथळा कधीही येत नाही, असेही त्याने सांगितले.