CoronaVirus : अमेरिकन जर्नलनंही मानलं, कोरोनाला पळवून लावण्यासाठी गंगाजल 'रामबाण'!
By श्रीकृष्ण अंकुश | Published: September 21, 2020 03:40 PM2020-09-21T15:40:35+5:302020-09-21T15:52:03+5:30
या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
वाराणसी - सध्या भारतासह अनेक देश कोरोनावरील प्रभावी लस अथवा औषध शोधण्यासाठी कंबंर कसून कामाला लागले आहेत. अशातच काशी हिन्दू विद्यापीठाच्या (बीएचयू) इंस्टिट्यूट ऑफ मेडिकल सायंसने (आयएमएस) गंगा नदीकाठी राहणाऱ्या लोकांवरील कोरोनाच्या परिणामासंदर्भात संशोधन केले आहे. या संशोधनात, गंगेच्या पाण्याचा दैनंदिन वापर करणाऱ्या लोकांवर कोरोनाचा परिणाम केवळ 10 टक्के असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे संशोधन अमेरिकेच्या इंटरनॅशनल जर्नल ऑफ मायक्रोबायोलॉजीच्या अंकातही प्रसिद्ध करण्यात आले आहे.
आता WHO प्राचीन औषधांमध्ये शोधणार कोरोनाचा इलाज! हर्बल मेडिसिनच्या ट्रायलचे केले समर्थन
बीएचयूतील डॉक्टर कोरोनावर 'व्हायरोफेज' नावाने संशोधन करत आहेत. न्यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. रामेश्वर चौरसिया आणि प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट प्रा. व्ही. एन. मिश्रा यांच्या नेतृत्वातील चमूला आढळून आले, की नियमित गंगा स्नान करणाऱ्या आणि गंगेचे पाणी पिणाऱ्या लोकांना कोरोना संक्रमणाचा किंचितही परिणाम होत नाही.
गंगेकाठी राहणाऱ्या 90 टक्के लोकांचा करोनापासून बचाव -
गंगेच्या काठावर राहणाऱ्या अथवा गंगेच्या पाण्याने स्नान करणाऱ्या 90 टक्के लोकांचा कोरोना संक्रमणापासून बचाव झाला आहे. याशिवाय, गंगेच्या काठावरील 42 जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कोरोनासंक्रमण 50 टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तसेच संक्रमणानंतर लवकरात लवकर बऱ्या होणाऱ्या रुग्णांची संख्याही अधिक आहे.
केंद्र सरकारच्या 3 योजना, केवळ 400 रुपयांत सुरक्षित होईल भविष्य
गंगाजलाचा नेजल स्प्रेदेखील तयार -
'वायरोफेज' रिसर्च टीमचे प्रमुख प्रा. व्ही.एन. मिश्र यांनी सांगितले, अभ्यासाबरोबरच गोमुखापासून ते गंगा सागरपर्यंत शंभर ठिकानांवर सॅम्पलिंग करण्यात आले आणि गंगेच्या पाण्यात ए-बायोटिकफेज अधिक अढळणारी ठिकानं निश्चित करण्यात आली. याशिवाय कोरोना रुग्णांवरील फेज थेरपीसाठीही गंगेच्या पाण्याचा नेजल स्प्रेदेखील तयार करण्यात आला आहे.
आता कधीच छापल्या जाणार नाहीत 2000च्या नोटा? मोदी सरकारनं संसदेत दिलं स्पष्टीकरण
परवानगीनंतर ट्रायललाही होणार सुरुवात -
या संपूर्ण संशोधनाचा अहवाल आयएमएसच्या एका समितीला पाठविण्यात आला आहे. प्रा. व्ही. भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखालील या 12 सदस्यीय समितीच्या मंजुरीनंतर कोरोना रुग्णांवर फेज थेरेपीचे परीक्षण सुरू होईल.
गंगनानीच्या पाण्याने होणार 250 लोकांवर परीक्षण -
गंगोत्रीपासून सुमारे 35 किलोमीटर खाली असलेल्या गंगनानी येथील पाण्याचा ह्यूमन ट्रायलसाठी वापर करण्यात येणार आहे. योजने प्रमाणे, 250 लोकांवर याचे परीक्षण केले जाईल. यातील अर्ध्या लोकांना औषधाशी कसल्याही प्रकारची छेडछाड केल्याशिवाय पंधरादिवसांसाठी गंगनानीचे पाणी नाकात टाकण्यासाठी दिले जाईल. तर इतरांना प्लेन डिस्टिल वॉटर देण्यात येईल. यानंतर आलेल्या परिणामांचा अभ्यास करून इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्चला (आयसीएमआर) अहवाल सादर केला जाईल.
मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी