ट्रम्प यांचा चीनला झटका, 90 दिवसांच्या आत टिकटॉकची संपत्ती विकण्याचा बाइटडान्सला आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 11:51 AM2020-08-15T11:51:54+5:302020-08-15T11:57:40+5:30
गेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती.
वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी चिनी कंपनी बाइटडान्सला टिकटॉक अॅपचा अमेरिकेतील संपूर्ण बिझनेस विकण्याचा आदेश दिला आहे. विशेष म्हणजे यासाठी अेरिकेने बाइटडान्सला 90 दिवसांची मुदतही दिली आहे. ट्रम्प यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे, की बाइटडान्सने, असे पाऊल उचलले, ज्यामुळे अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. याचे विश्वासार्ह पुरावेही आहेत.
गेल्या आठवड्यातच डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉक आणि वुईचॅटच्या चिनी मालकांसोबत डिलिंग करण्यावर बंदी घातली होती. ते म्हणाले होते, की टिकटॉक आणि वुईचॅट अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षितता, परराष्ट्र नीती आणि अर्थव्यवस्थेसाठी धोका आहे. टिकटॉकसंदर्भात देण्यात आलेल्या या आदेशाचा अर्थ नेमका काय? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अमेरिकेत 10 कोटी युझर्स हे अॅप वापरतात.
मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू -
ट्रम्प यांनी बाइटडान्सला अमेरिकन यूझर्सकडून घेण्यात आलेल्या अथवा कुठल्याही प्रकारचा डाटा परत देण्यासही सांगण्यात आले आहे. अमेरिकेतील टिकटॉचा व्यवसाय विकत घेण्यासंदर्भात मायक्रोसॉफ्टची बाइटडान्ससोबत चर्चा सुरू आहे. एवढेच नाही, तर मायक्रोसॉफ्ट अथवा इतर कुठलीही कंपनी टिकटॉकचा अमेरिकेतील व्यवसाय विकत घेऊ शकली नाही तर देशात टिकटॉक बॅन करण्यासाठी 15 सप्टेंबर ही तारीख डोनाल्ड ट्रम्प यांनी निश्चित केली आहे. त्यांनी यासदर्भातील कार्यकारी आदेशावरही स्वाक्षरी केली आहे.
ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच चिनी अॅप टिकटॉक आणि वुईचॅट 45 दिवसांच्या आत बंद करण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली होती.
चिनी कम्युनिस्ट पार्टीवर निशाणा -
डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे, की 'डेटा कलेक्शनमुळे चिनी कम्युनिस्ट पार्टी अमेरिकन लोकांच्या खासगी माहितीपर्यंत पोहोचते. यामुळे चीन अमेरिकन कर्मचारी आणि ठेकेदारांची ठिकाणं ट्रॅक करू शकतो. एवढेच नाही, तर कम्युनिस्ट पार्टी खासगी माहितीचा ब्लॅकमेलिंगसाठी आणि कॉर्पोरेट हेरगीरीसाठीही वापर करू शकतो,' असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या -
CoronaVirusVaccine : रशियन कोरोना लसीची अमेरिकेने उडवली खिल्ली, म्हणाले - माकडा लायकही नाही!
Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी
CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस
CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर
कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा