भाजपाच्या त्या पोस्टरवर अमेरिकेचे सैनिक
By admin | Published: October 24, 2016 10:20 PM2016-10-24T22:20:49+5:302016-10-24T22:20:49+5:30
स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ते पोस्टर आता चांगलेच वादात सापडले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 24 - उत्तरप्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणूकीत भाजपाने जोरदार तयारी सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रचारासाठी उत्तरप्रदेशच्या दौऱ्यावर आले आहेत. स्वागतासाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पोस्टरबाजी केली आहे. मोदींच्या स्वागतासाठी वाराणसीमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी लावलेले ते पोस्टर आता चांगलेच वादात सापडले आहेत.
या पोस्टरवर भारतीय सैनिकांऐवजी चक्क अमेरिकन सैन्याचे फोटो लावण्यात आले आहेत. वाराणसी महानगरच्या वतीने लावण्यात आलेल्या या पोस्टरच्या खाली हातात बंदुका घेऊन असलेल्या सैनिकांचा फोटो लावण्यात आला आहे. पण दुदैव म्हणजे हा अमेरिकेतल्या १०१ एअरबॉर्न डिव्हिजनह्णच्या सैनिकांचा फोटो आहे. बँड ऑफ ब्रदर्स या प्रसिद्ध अशा मालिकेच्या पोस्टवर देखील हा फोटो लावण्यात आला होता.
उरी येथेली हल्ल्याचा बदला घेत भारताने पाकव्याप्त काश्मीमरमध्ये शिरुन सर्जीकल स्ट्राईक्स करत पाकिस्तानी दहशतवाद्यांची तळ उद्धवस्त केली होती. उत्तर प्रदेशच्या निवडणुकांसाठी भारतीय सैन्य हाच भाजपाच्या प्रचाराचा हुकमी एक्का राहिल असेही मत अनेकांनी मांडले, त्यामुळे भाजपाच्या प्रचारात भारतीय सैनिकांची छायाचित्र अग्रस्थानी असतील यात काही शंकाच नाही. पण ज्याने देशासाठी प्राण लावले त्यांचे फोटो पोस्टरवर लावण्याऐवजी अमेरिकन सैनिकांचे छायाचित्र का लावले अशा टीका सोशल मीडियावर होत आहेत. सोशल मीडियावर हे पोस्टर व्हायरल होत आहे.