गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांच्याबरोबर अमेरिकेतील 'स्त्री देवी कट्टा'च्या दिलखुलास गप्पाटप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2023 05:56 PM2023-02-11T17:56:02+5:302023-02-11T18:06:38+5:30

Priyanka Mohite : भारतीय वंशाचे लोक जगातील प्रत्येक देशामध्ये आपला ठसा उमटवत आहेत.

American 'Stri Devi Katta' chats with mountaineer Priyanka Mohite | गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांच्याबरोबर अमेरिकेतील 'स्त्री देवी कट्टा'च्या दिलखुलास गप्पाटप्पा

गिर्यारोहक प्रियांका मोहिते यांच्याबरोबर अमेरिकेतील 'स्त्री देवी कट्टा'च्या दिलखुलास गप्पाटप्पा

Next

'स्त्री देवी कट्टा' या मराठी महिला मंडळाच्या वॉशिंग्टन DC किंवा अमेरिकेच्या राजधानी जवळ असणाऱ्या या संघाच्या गप्पाटप्पा 'कट्टा मिठा बोल' या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रियांका मोहिते यांच्याशी गिर्यारोहणाबद्दल मनसोक्त गप्पा झाल्या. भारतीय वंशाचे लोक जगातील प्रत्येक देशामध्ये आपला ठसा उमटवत आहेत. याच दरम्यान भारतामध्ये राहूनही काही लोक यशाचे नवीन शिखर गाठत आहेत आणि भारताचे नाव उज्वल करत आहेत. आपल्या भारतीय मुलीही मुलाएवढ्याच पराक्रमी आणि यशस्वी आहे. महाराष्ट्राच्या प्रियांका मोहिते या भारतातल्या प्रसिद्ध गिर्यारोहक आहेत आणि त्यांनी  हिमालयातले सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केले आहे. 

प्रियांका या हे यश मिळवणाऱ्या पहिल्या भारतीय महिला असून ज्यांनी पाच शिखरं सर केली आहेत. 2021 मध्ये त्यांना सरकारने राष्ट्रपतींच्या हस्ते Tenzing Norgay Award देऊन सन्मानित केलं आहे. 'अशक्य' हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नसावाच असे वाटते. महाराष्ट्रातल्या सातारा शहरात त्यांचा जन्म झाला. लहानपणापासून काकांसोबत जवळपासच्या किल्ल्यांवर त्या जात असत. त्यामुळे गिर्यारोहणाबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतदेशाबद्दल पण अभिमान त्यांच्यामध्ये निर्माण झाला. त्यांनी गिर्यारोहणाचा एक कोर्से पास केला आणि त्यामध्ये 'A ' ग्रेड मिळवली. 

21,000 फुटांवरचे कळसुबाई शिखर पण सर केले. यशानंतर, त्यांना 29000 फुटांचे  एव्हरेस्ट चढायची संधी मिळाली. त्यावेळेस प्रियांका फक्त वीस वर्षांच्या होत्या. त्यामुळे बऱ्याच लोकांसाठी ही कल्पना शक्य नव्हती. आजूबाजुच्या अडचणींवर लक्ष न देता, प्रियांकाने एव्हरेस्टला सर करण्यासाठीचे ट्रेनिंग घेतले आणि एवरेस्ट सर करून दाखवला. प्रियांका ही पहिली भारतीय स्त्री आहे जी हा पराक्रम करू शकली आहे. कुशाग्र बुद्धीमुळे त्यांनी भरतनाट्यममध्ये 'विशारद' ही पदवी आणि Biotechnology मध्ये पण पदवी मिळवली आहे. 

प्रियांकाशी बोलताना कळले की, त्या भारताचा झेंडा प्रत्येक मोहिमेवर घेऊन जातात. त्याचबरोबर हे पण जाणवत होतं की समाज आणि कुटुंब खूप जास्त मनोबल देतात आणि यशाच्या श्रेयामध्ये त्यांचाही खूप मोठा वाटा आहे. नवभारत आणि नवभारतातली स्त्री हे दोघंही आज खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाले आहेत. आता त्या फोर्ब्स इंडियाच्या द शो टॉपर्स 2022-23 एडिशन विथ 50 अमेझिंग पिपल विथ इन्स्पिरेशनल स्पोर्ट्स पर्सनालिटीज ऑलम्पिक मेडल विनर्स असलेल्या नीरज चोप्रा आणि निखत झरीनच्या लिस्टमध्ये आल्या आहेत. 


 

Web Title: American 'Stri Devi Katta' chats with mountaineer Priyanka Mohite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.