अमेरिकन व्हिसाधारक भारतीयाचे संयुक्त अरब अमिरातीत स्वागत

By admin | Published: May 3, 2017 07:02 AM2017-05-03T07:02:54+5:302017-05-03T07:02:54+5:30

अमेरिक न वैध व्हिसा आणि ग्रीनकार्डधारक भारतीय पासपोर्टधारक व्यक्तींचे दुबई विमानतळावर १ मे रोजी

American visa holders welcome United Arab Emirates to India | अमेरिकन व्हिसाधारक भारतीयाचे संयुक्त अरब अमिरातीत स्वागत

अमेरिकन व्हिसाधारक भारतीयाचे संयुक्त अरब अमिरातीत स्वागत

Next

ुबई : अमेरिकन वैध व्हिसा आणि ग्रीनकार्डधारक भारतीय पासपोर्टधारक व्यक्तींचे दुबई विमानतळावर १ मेरोजी
अगत्याने स्वागत करण्यात आले. संयुक्त अरब अमिरात आणि भारतादरम्यानचे आर्थिक , राजक ीय आणि व्यापारी संबंध दृढ क रण्याच्या उद्देशातहत संयुक्त अरब अमिरात सरक ारने अमेरिके चा वैध व्हिसा असलेल्या किंवा ग्रीनकार्डधारक भारतीयांना संयुक्त अरब अमिरातचा व्हिसा देण्याचा (व्हिसा आॅन अराईव्हल) धोरणात्मक निर्णय घेतला होता. या नवीन धोरणाच्या अंमलबजावणीच्या पहिल्याच दिवशी दुबई विमानतळावर भारतीय व्यक्तींचे आदराने स्वागत क रण्यात
आले.
या नवीन धोरणानुसार सर्वसामान्य भारतीय पासपोर्टसोबत अमेरिके चा वैध व्हिसा किंवा ग्रीनकार्डधारक भारतीयांना येथे
पोहोचताच १४ दिवसांसाठी संयुक्त अरब अमिरातचा व्हिसा देण्यात येणार आहे, तसेच या व्हिसाचा अवधी एवढ्याच दिवसांसाठी वाढविण्याचा पर्या यही यात आहे. या धोरणाचा लाभ घेणारी ही पहिली भारतीय व्यक्त ी असून, दुबईविमानतळाच्या अधिक ाऱ्यांनी, तसेच   संयुक्त अरब अमिरात सरक ारच्या प्रतिनिधींनी त्याचेस्वागत केले. या भारतीय प्रवाशांसोबतचे छायाचित्र इन्स्टाग्रामवर टाक ण्यात आले असून, जनरल डायरेक्टोरेट आॅफ रेसिडेन्सी अँड फ ॉरेनर्स अफेअर्सच्या (दुबई) अधिक ाऱ्यांनी या भारतीय प्रवाशाचेदुबईविमानतळावर आगमन झाल्याची घोषणा केली आहे.

संयुक्त अरब अमिरातचा भारत दुसऱ्या क्रमांक ाचा सर्वात मोठा भागीदार देश आहे. या दोन्ही देशांदरम्यान ६० अब्ज डॉलरचा वार्षिक व्यापार होतो, तसेच वर्षाक ाठी संयुक्त अमिरातचा २७ अब्ज डॉलरचा भारतासोबत निर्यात व्यापार होतो, तसेच संयुक्त अरब अमिरातमधील भारतातून होणाऱ्या निर्यात व्यापाराचा आक डा ३३ अब्ज डॉलर आहे.

Web Title: American visa holders welcome United Arab Emirates to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.