VIDEO- वादग्रस्त राफेल विमानांचे अखेर 'भारतात लँडिंग'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 10:14 PM2019-02-13T22:14:39+5:302019-02-13T22:16:40+5:30

एयरो इंडिया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी राफेल विमानं भारतात दाखल झाली आहेत. या प्रदर्शनात एकूण तीन राफेल विमानं सहभाग घेणार आहेत.

Amid Political Wrangling, Three Rafale Jets Land in Bengaluru for Aero India Show 2019 | VIDEO- वादग्रस्त राफेल विमानांचे अखेर 'भारतात लँडिंग'

VIDEO- वादग्रस्त राफेल विमानांचे अखेर 'भारतात लँडिंग'

Next

बंगळुरू- राफेल विमान प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप होत असतात. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधीही राफेल विमान करारावरून मोदींना लक्ष्य करण्याची एकही संधी सोडत नाहीत. फ्रान्सबरोबर 36 लढाऊ विमान खरेदीचा करार करण्यात आला होता, त्यातील दोन विमानं भारतातल्या बंगळुरू विमानतळावर उतरली आहेत. ही दोन्ही विमानं एयरो इंडिया या प्रदर्शनात सहभागी होण्यासाठी भारतात दाखल झाली आहेत. या प्रदर्शनात एकूण तीन राफेल विमानं सहभाग घेणार आहेत.

भारतात पोहोचलेले राफेल विमान हे फ्रान्सच्या हवाई दलातील आहेत. एअरो इंडियाचं प्रदर्शन 20 ते 24 फेब्रुवारीदरम्यान बंगळुरूत आयोजित करण्यात आलं आहे. या प्रदर्शनात जवळपास 57 एअरक्राफ्ट सहभागी होणार आहेत. त्यासाठी फ्रान्सच्या हवाई दलानं तीन राफेल विमानं भारतात पाठवली आहेत. यातील दोन विमानं बुधवारी भारतात पोहोचली असून, तर तिसरं विमान प्रदर्शनाच्या दिवशी पोहोचणार आहे. हवाई दलाचे डिप्‍टी चीफ एअर मार्शल विवेक चौधरीसुद्धा राफेलची विमानं उडवणार आहेत. दरम्यान, भारतीय हवाईदलासाठी दस्सॉल्ट या फ्रेंच कंपनीकडून 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा फ्रेंच सरकारशी करार झाला आहे. हा सौदा मोदी सरकारने फ्रान्सच्या सरकारशी आरंभी केला तेव्हा त्यात कुणीही मध्यस्थ नव्हता. त्या वेळी ही विमाने देशाला प्रत्येकी 500 कोटी रुपयांना मिळणार होती.


अंबानींचा त्यात शिरकाव झाल्यानंतर त्यांची प्रत्येकी किंमत 1600 कोटी रुपये झाली आहे. पूर्वी 126 विमानांसाठी झालेला हा सौदाही आता 36 विमानांवर आला आहे. ही विमाने संरक्षण खात्याची गरज म्हणून विकत घेण्याचा व्यवहार मनोहर पर्रीकर हे देशाचे संरक्षणमंत्री असताना झाला. आता त्यांची जागा निर्मला सीतारामन यांनी घेतली आहे. याच काळात या विमानांच्या किमती तीनपटींहून अधिक वाढल्याचे व त्यांची संख्या कमी झाल्याचे देशाला कळले आहे. भारतातील हवाई दलातील लढाऊ विमानांची संख्या झपाट्याने कमी होत असताना उच्च तंत्रज्ञानावर आधारित लढाऊ विमानांची देशाला गरज आहे. देशाला 150 विमानांची आवश्यकता आहे.

Web Title: Amid Political Wrangling, Three Rafale Jets Land in Bengaluru for Aero India Show 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.