'नेहरुंची 'ती' चूक हिमालयाहून मोठी; आता खरा इतिहास लोकांसमोर येणारच'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 04:55 PM2019-09-29T16:55:35+5:302019-09-29T16:56:18+5:30
भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल.
नवी दिल्ली - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कलम ३७० च्या मुद्द्यावरुन काँग्रेसला टार्गेट केलं आहे. काश्मीरचा इतिहास तोडून-मोडून देशासमोर ठेवला गेला. कारण ज्या लोकांची चुकी होती त्यांनी हा इतिहास लिहिला. स्वत:ची चूक झाकण्यासाठी चुकीचा इतिहास जनतेसमोर आणला. मात्र आता खरी वेळ आली आहे की, जनतेसमोर काश्मीरचा खरा इतिहास आणि वास्तव लोकांसमोर मांडला जाईल.
माजी सरकारी अधिकाऱ्यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात अमित शहा बोलत होते. त्यावेळी त्यांनी कलम ३७० हटविण्याचा निर्णय ऐतिहासिक असल्याचं सांगितले. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी सुरुवातीपासून कलम ३७० हटविण्याचं अभियान सुरु केलं होतं. हा राजकीय निर्णय असल्याच्या विरोधकांच्या आरोपालाही शहांनी उत्तर दिलं. भाजपा जेव्हापासून अस्तित्वात आली आहे तेव्हापासून एक देश, एक संविधान याची चर्चा करते. काश्मिरींवर गोळी चालणार नाही असं आश्वासनंही दिलं.
कश्मीर का इतिहास तोड़-मरोड़कर देश के सामने रखा गया।
— BJP (@BJP4India) September 29, 2019
क्योंकि जिनकी गलतियां थीं उनके हिस्से में इतिहास लिखने की जिम्मेदारी आई।
श्री अमित शाह का 'पूर्व सिविल सेवा अधिकारी मंच की पांचवीं वार्षिक व्याख्यान माला' में संबोधन https://t.co/EswbJsY5Yq
कलम ३७० हटविण्यासाठी भाजपा आणि अन्य पक्ष खूप वर्षापासून संघर्ष करत होते. आम्ही फक्त बोलत नाही तर वारंवार यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत कलम ३७० हटविला नाही तोवर वेगवेगळे ११ आंदोलन करण्यात आले. जे आमच्यावर आरोप लावतात की, राजकीय फायद्यासाठी हा निर्णय घेतला गेला त्यांना स्पष्ट करतो की, जेव्हा आमची पार्टी उदयास आली तेव्हापासून आमचं उद्दिष्ट कलम ३७० हटविणे हे होतं असं अमित शहांनी सांगितले.
भारताच्या स्वातंत्र्यावेळी इंग्रजांशी चर्चा करण्याची मुख्य भूमिका काँग्रेसची होती. जगामध्ये कोणत्याही देशाबाबत असं घडलं नाही की, स्वातंत्र्यावेळी देशाची स्थिती स्वातंत्र्यापूर्वीच ठरविली जाईल. तेव्हा ठरलं होतं की, भारत ६३१ खंडामध्ये विभागला जाईल. त्यावेळी ब्रिटन संसदेत एक प्रस्ताव पास झाला असता तर ६३० संस्थानं भारतात विलीन झाली असती. मात्र तसं होऊ शकलं नाही. त्यासाठी प्रयत्न केले गोले नाही. विचार-विनिमय केला नाही, चर्चा घडली नाही असं अमित शहांनी सांगितले.
तसेच ज्यावेळी आपलं सैन्य जिंकत होते त्यावेळी युद्धविराम का दिलं गेले? त्यावेळी युद्ध थांबविण्याची काय गरज होती. यूएनमध्ये जाण्याचा निर्णय तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांचा वैयक्तिक होता. नेहरूंची ही चूक हिमालयाहून मोठी होती. हा दोन्ही देशांमधला वाद होता असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर टीका केली.